अजित पवारांनी घेतली अमित शहांची दिल्लीत भेट; बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीत नेमके काय घडले?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी अचानक दिल्लीला गेले व त्यांनी भाजप नेते, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यामध्ये पवार यांनी प्रस्तावित राज्य मंत्रिमंडळ विस्तार, तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत आपले मत शहा यांच्यासमोर मांडल्याचे समजते. पवार यांनी युतीतील एका ‘संवेदनशील’ विषयाबाबतही त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते, मात्र त्याचा तपशील समोर आलेला नाही.राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्याच दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भाजपने दिल्लीत बोलावून घेणे याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. शुक्रवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ, तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. पवार यांनी आपल्या दिल्लीदौऱ्यात शहा यांच्याशी विधान परिषदेत आपल्या पक्षाच्या कामगिरीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

MLC Election Results 2024: काँग्रेसचा पुन्हा गेम, मते फुटल्याची चर्चा, महायुतीचा विजयी झेंडा, मविआला धक्का!
…तरआगामी निवडणुकीत फायदा

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीआधी देण्याचे सूतोवाच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केले आहे. महायुतीनेही शेतकरी कर्जमाफीवर सकारात्मक घोषणा करावी, यासाठी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. शेतकरी ही आपल्या पक्षाची मतपेढी असल्याने आघाडीच्या आधी याबाबतची घोषणा महायुती सरकारने केल्यास त्याचा आगामी निवडणुकीत फायदा मिळू शकतो, या अनुषंगाने पवार व शहा यांच्यात त्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरात?

विधान परिषद निवणुकीनंतर पुढच्या आठवडाभरात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या संभाव्य विस्तारामध्ये भाजपच्या दोन सहकाऱ्यांपैकी प्रत्येक पक्षाला किमान दोन मंत्रि‍पदांची अपेक्षा आहे. राज्यपाल नियुक्त आमदार… व विधान परिषदेचे सभापतिपद या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे कळते. लाडकी बहीण योजना जाहीर होताच महाविकास आघाडीने त्यावर टीका सुरू केली आहे.

Source link

ajit pawarAjit Pawar Amit Shahajit pawar delhi visitAjit Pawar Meet Amit Shahपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपमहायुती सरकारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षविधान परिषद निवडणूक २०२४शेतकरी कर्जमाफी
Comments (0)
Add Comment