Shooting on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार, माजी राष्ट्राध्यक्ष थोडक्यात वाचले, अमेरिकेत खळबळ

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला आहे. ही घटना घडताच एकच खळबळ उडाली. गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प यांचा चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसत होता. तर डोनाल्ड ट्रम्प सध्या सुरक्षित असल्याचे समजते. पण या घटनेत गोळीबार करणाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक रॅली सुरु होती. यादरम्यान ते स्टेजवर बोलत होते, तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकू आला. स्फोटांच्या आवाजाने ट्रम्प एकाएकी स्टेजवर पडले आणि खळबळ उडाली. या गोंधळादरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्यांना ताबडतोब घेरले आणि मंचावरून खाली उतरवले. यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानावर रक्त ओघळताना दिसत होते. स्टेजवरून बाहेर पडताना ट्रम्प यांनी आपली वज्रमुठ आवळली आहे आणि ती हवेत हलवली आहे. हे लढण्याचे प्रतीक दाखवून त्यांनी हल्लेखोरांना आणि उपस्थितांना संकेत दिले आहेत.
Crossbow Attack: लंडनमध्ये तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ; BBC पत्रकाराच्या पत्नीसह दोघा मुलींना क्रॉसबोचा वापर करून केले ठार
बटलर काउंटीचे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी या घटनेबद्दल सांगितले की, ट्रम्प यांच्या रॅलीत गोळी झाडणाऱ्या आरोपीला ठार करण्यात आले आहे. यासोबतच रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. पेनसिल्व्हेनियातील या निवडणूक रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प आता सुरक्षित आहेत. परंतु ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी मोठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसने सांगितले आहे.

असोसिएटेड प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हा गोळीबार ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न होता. १९८१ मध्ये रोनाल्ड रीगन यांच्यावर गोळ्या झााडण्यात आल्या त्यानंतर अमेरिकेतील अध्यक्ष किंवा अध्यक्षपदाच्या उमेदवारावर असा पहिलाच हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
US Recession: पुन्हा मंदीचे काळे ढग! अमेरिका मंदीच्या कचाट्यात, जगभरातील देशांना रेड अलर्ट, मिळू लागले संकेत
गोळीबारानंतर तातडीने कारवाई केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पथकाचे आभार मानले आहेत. त्याचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी या घटनेनंतर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प हे ठीक आहेत आणि त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ट्रम्प यांच्या मुलानेही आपल्या वडीलांची तब्येत ठीक असल्याचा हवाला दिला आहे. तर या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही.

Source link

america newsamerica presidential electiondonald trumpelection campaign in pennsylvaniajoe bidenअमेरिकेत गोळीबारअमेरिकेतून मोठी अपडेटट्रम्प यांची निवडणूक रॅलीडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबारराष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मोठी घटना
Comments (0)
Add Comment