डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या उजव्या कानाजवळ गोळी लागल्याचा त्यांनी दावा केला आहे. मात्र, गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने घटनास्थळावरून बाहेर काढले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

मी या घटनेचा तीव्र निषेध करतो – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये (एक्स) म्हटले आहे की, ”माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना पीडित, जखमी आणि अमेरिकन लोकांच्या कुटुंबियांसोबत आहेत” ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
Shooting on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार, माजी राष्ट्राध्यक्ष थोडक्यात वाचले, अमेरिकेत खळबळ

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला आहे

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ”संघीय सरकारच्या सर्व एजन्सींनी मला परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. मी डोनाल्ड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांच्या डॉक्टरांसोबत आहे आणि अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. मी गुप्त सेवा आणि राज्य संस्थांसह सर्व एजन्सींचे आभार मानू इच्छितो. मूळ गोष्ट अशी आहे की ट्रम्प यांची रॅली कोणतीही अडचण न येता शांततेत आयोजित करायला हवी होती. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे.

माजी राष्ट्रपतींवर गोळीबार करणाऱ्यांचा मृत्यू झाला

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी ट्विट केलं आहे की, ”संपूर्ण संरक्षण विभाग या हिंसाचाराचा निषेध करतो, या हिंसेला आपल्या लोकशाहीत स्थान नाही. अमेरिकेतील आमचे मतभेद सोडवण्याचा हा मार्ग नाही आणि असं कधीही होऊ शकत नाही. मला रिपोर्टनुसार माहिती मिळाली आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि या धक्कादायक घटनेमुळे भीतीच्या छायेत असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर ठार झाले” असल्याचं देखील सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सांगितलं आहे.

Source link

donald trump fireddonald trump fired narendra modi reactionformer president donald trump firedformer us president donald trump firedअमेरिका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबारडोनाल्ड ट्रम्प गोळीबारडोनाल्ड ट्रम्प गोळीबार नरेंद्र मोदी प्रतिक्रियामाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबार
Comments (0)
Add Comment