Donald Trump Attack: डोनाल्ड ट्रम्प गोळीबार; आरोपीला स्नाइपरने उडवलं, घटनेचा Video समोर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या उजव्या कानाजवळ गोळी लागल्याचा त्यांनी दावा केला आहे. मात्र, गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने घटनास्थळावरून बाहेर काढले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अमेरिकेच्या पोलीस प्रशासनातील स्नाइपरने एका घराच्या टेरेसवर बसून मारलं आहे. त्या आरोपीला कसं मारलं? त्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक रॅली सुरु होती. यादरम्यान ते स्टेजवर बोलत होते, तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकू आला. गोळीच्या आवाजाने ट्रम्प एकाएकी स्टेजवर पडले आणि खळबळ उडाली. या गोंधळादरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्यांना ताबडतोब घेरले आणि मंचावरून खाली उतरवले. यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानावर रक्त वाहताना दिसत होते. हल्ला करणाऱ्याला कसं मारलं त्याचा देखील व्हिडिओ आता समोर आला आहे.

Donald Trump Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये (एक्स) म्हटले आहे की, ”माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना पीडित, जखमी आणि अमेरिकन लोकांच्या कुटुंबियांसोबत आहेत” ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ”संघीय सरकारच्या सर्व एजन्सींनी मला परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. मी डोनाल्ड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांच्या डॉक्टरांसोबत आहे आणि अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. मी गुप्त सेवा आणि राज्य संस्थांसह सर्व एजन्सींचे आभार मानू इच्छितो. मूळ गोष्ट अशी आहे की ट्रम्प यांची रॅली कोणतीही अडचण न येता शांततेत आयोजित करायला हवी होती. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे.

Source link

donald trump accused killeddonald trump shooting accused shootformer president donald trump shootingडोनाल्ड ट्रम्प आरोपीला मारलंडोनाल्ड ट्रम्प गोळीबार आरोपी शुटमाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबार
Comments (0)
Add Comment