कोण होता ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा?
हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स असल्याची माहिती समोर आली आहे. हा २० वर्षीय तरुण बेथखेल पार्क पेन्सिल्वेनियाचा राहणारा होता. घटनास्थळावरुन एक एआर-१५ सेमी ऑटोमॅटिक रायफलही जप्त करण्यात आली आहे. याच रायफलने ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची शक्यता आहे. या गोळीबाराला उत्तर देताना काऊंटर स्नायपर्सची गोळी थेट हल्लेखोराच्या डोक्यात लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या प्रचार सभेत भाषण देत होते. तिथून सुमारे १२० मीटर लांब एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावर एक व्यक्ती बंदूक घेऊन उभा होता. त्याने थेट ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आणि गोळी झाडली. ट्रम्प यांचं ओपन-एअर कँपेन हे बटलर फार्म शो ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली होती. मोकळी जागा असल्याने आरोपीला निशाणा साधणं सोपं झालं. हल्लेखोर जिथे उभा होता तिथून ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला जाऊ शकत होता.
ट्रम्प जिथे उभे होते त्याच्या मागे आणखी एक स्ट्रक्चर होतं, ज्यावर यूएसच्या सिक्रेट सर्व्हिसच्या काऊंटर स्नायपर्सची टीम तैनात होती. हल्लेखोराने गोळी झाडताच काऊंटर स्नायपर्सची टीम अॅक्टिव्ह झाली आणि २०० मीटर लांबीवरुन त्यांनी हल्लेखोराला ठार केलं. ज्या इमारतीवर हल्लेखोराचा मृतदेह सापडला ती इमारत एजीआर इंटरनॅशनल कंपनीची होती.
२ सेंटिमीटर आणि ट्रम्प बालंबाल वाचले
या प्रकरणाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये दिसून येतं की ट्रम्प हे भाषण देत होते. तेवढ्यात गोळीबार सुरु झाला. गोळी ट्रम्प यांच्या डाव्या कानाला छेदून निघाली. जर ही गोळी दोन सेंटिमीटर आतल्या बाजुला आली असती तर ट्रम्प यांचा जीव गेला असता.