झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतीत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, ”माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चिंतेत आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ट्रम्प यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. आमचे विचार आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत, जखमी झालेल्या आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत”.
जो बायडन यांनी नोंदवला निषेध
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी देखील निषेध नोंदवला आहे ते म्हणाले की, ”संघीय सरकारच्या सर्व एजन्सींनी मला परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. मी डोनाल्ड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांच्या डॉक्टरांसोबत आहे आणि अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. मी गुप्त सेवा आणि राज्य संस्थांसह सर्व एजन्सींचे आभार मानू इच्छितो. मूळ गोष्ट अशी आहे की ट्रम्प यांची रॅली कोणतीही अडचण न येता शांततेत आयोजित करायला हवी होती. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे.”
दरम्यान, या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गोळीबार करण्याऱ्या व्यक्तीला अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसच्या एजंटांनी ठार मारले आहे.