Justice Rohit Arya : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांचा भाजपमध्ये प्रवेश

भोपाळ : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांनी शनिवारी ( 13 जुलै) रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राघवेंद्र शर्मा व उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

कोण आहेत न्यायमूर्ती रोहित आर्य ?

न्यायमूर्ती आर्य यांनी 1984 मध्ये वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2003 मध्ये त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती आर्य यांनी केंद्र सरकार, एसबीआय, दूरसंचार विभाग, बीएसएनएल आणि आयकर विभागासाठी महत्वाचे खटलेही लढवले. त्यानंतर 2013 मध्ये न्यायमूर्ती आर्य यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली. 11 वर्षे सेवा करून न्यायमूर्ती आर्य हे 27 एप्रिल 2024 रोजी निवृत्त झाले.
Lord Jagannath Temple : 46 वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराचे ‘रत्न’ भांडार उघडले, भांडारात काय काय सापडलं ?

कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि नलिन यादव जामीन प्रकरण

कॉमेडियन मुनावर फारुकी आणि नलिन यादव या दोन व्यक्तींवर धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप होता. या प्रकरणी न्यायमूर्ती आर्य यांनी मुनावर फारुकी आणि नलिन यादव यांना जमीन देण्यास नकार दिला होता. नंतर न्यायमूर्ती आर्य यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला होता.

न्यायमूर्ती आर्य हे एका महिलेसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या आरोपीला जामीन दिल्याबद्दल चर्चेत आले होते. जामीन मागणाऱ्या सदस्याने आणि त्यांच्या पत्नीने रक्षाबंधनाच्या दिवशी राखी आणि मिठाईचा डबा घेऊन तक्रारदार महिलेच्या घरी जावे, असे त्यांनी जामीन आदेशात म्हटले होते. तसेच जामिनाच्या अटींमध्ये आरोपी तक्रारदार महिलेला आयुष्यभर संरक्षण देईल, असेही म्हटले होते. मात्र, या सूचनेला सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली होती.

Source link

Justice Rohit AryaJustice Rohit Arya join bjpjustice rohit arya latest newsjustice rohit arya news in hindiन्यायमूर्ती रोहित आर्यन्यायमूर्ती रोहित आर्य बातमीन्यायमूर्ती रोहित आर्य भाजप प्रवेशमध्यप्रदेश
Comments (0)
Add Comment