NSG Team In Ayodhya : अयोध्या राम मंदिराच्या सुरक्षेत वाढ, एनएसजी कमांडो मंदिर परिसराची सुरक्षा चाचणी घेणार

अयोध्या : अयोध्या राम मंदिराच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी अयोध्येत राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे (NSG)हब तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एनएसजीची एक तुकडी कायमस्वरूपी अयोध्येत तैनात केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या (17 जुलै) रोजी एनएसजी कमांडोची एक तुकडी आयोध्येत येणार असून चार दिवस राम मंदिर परिसराच्या सुरक्षेचे मूल्यांकन करणार आहे.

अयोध्येत दहशतवाद हल्ल्याची भीती

अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यापासून दहशतवादी हल्ल्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे वेळीच सतर्कता म्हणून केंद्र सरकार अयोध्येच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. राम मंदिराचे निर्माण झाल्यापासून लाखो भाविक हे आयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे भाविकांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडोचे हब तयार करण्यात येणार आहे.
Lord Jagannath Temple : 46 वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराचे ‘रत्न’ भांडार उघडले, भांडारात काय काय सापडलं ?

राम मंदिर परिसरात सुरक्षा चाचणी घेतली जाणार

एनएसजीची टीम अयोध्येत पोहोचणार आहे. राम मंदिराच्या संपूर्ण संकुलाच्या सुरक्षेचा आढावा कमांडो घेणार आहेत. तसेच जर दहशतवादी हल्ले झाले तर त्यांचा सामना कसा करता येईल या विषयी टीम संबंधित अधिकाऱ्यांशी विचारमंथन करणार आहे. रामनवमी, सावन आणि कार्तिक परिक्रमा यात्रा अशा सणांमुळे राम मंदिरात मोठी गर्दी होत असते. याच अनुषंगाने एटीएसकडे मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. आता एसएसएफचे कमांडो राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय सीआरपीएफ आणि पीएसीचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. तर यातील एसएसएफच्या जवानांना एनएसजीनेच प्रशिक्षण दिले आहे.

2005 रोजी झाला होता दहशतवादी हल्ला

5 जुलै 2005 रोजी अयोध्येत दहशतवादी हल्ला झाला होता. राम लल्ला तंबूत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे हल्ल्यात सहभागी असलेले पाचही दहशतवादी मारले गेले होते. त्यामुळे राम मंदिराला कायमच धोका राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देखील दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. याच अनुषंगाने राम मंदिर परिसराची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

Source link

ayodhya newsayodhya ram mandir securityAyodhya Ram Mandir TOPICayodhya ram templeNSG Team In Ayodhyaअयोध्या राम मंदिरअयोध्या राम मंदिर न्यूजअयोध्या राम मंदिर सुरक्षा
Comments (0)
Add Comment