दहशत निर्माण करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

गुंडा विरोधी पथकाने जबरदस्तीने लुटमार करुन दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपीस केले जेरबंद…

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२७) जुन २०२४ रोजी उपनगर पोलिस ठाणे हद्दीत रावल वाईन्सच्या समोर यातील फिर्यादी श्रीमती अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असतांना आरोपी सागर सदावर्ते, किरण पाटील,रोहित जाधव व दोन अनोळखी इसम यांनी मागील भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ व धमकी देवुन त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे, फुटाण्याचा माल इकडे तिकडे फेकुन हातगाडी पलटी करुन आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडयाने मारहान केली व तसेच फिर्यादी यांचेकडे असलेले ७०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले यावरुन दि( ११) जुलै रोजी उपनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३२ / २०२४ भादंविक ३९५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.

सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी किरण पाटील हा उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील पंचशील नगर परिसरात
असल्याबाबत गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि  ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन पथकातील पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी आरोपी किरण पाटील यास पकडण्यासाठी पंचशील नगर परिसरात सापळा लावला असता आरोपीतास पोलिसांची चाहुल लागताच आरोपी हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन पळुन जात असतांना त्याचा
पाठलाग करुन आरोपी किरण रतन पाटील उर्फ गुजर वय ३५ वर्षे, रा. पंचशिल नगर, शिवाजी नगर मागे, नाशिक यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपासकामी उपनगर पोलिस स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णीक, पोलिस उपायुक्त(गुन्हे)  प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे)संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत,मलंग गुंजाळ, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रविण चव्हाण, निवृत्ती माळी, मनिषा कांबळे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

Comments (0)
Add Comment