जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्याचे कर्क राशीत संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. वृषभसह ३ राशींवर आर्थिक संकट ओढावेल. त्यामुळे खर्चाचे बजेट चुकू शकते. उधारी घेणे टाळा, अन्यथा अडचणीत सापडाल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. संपत्तीत वाढ होईल. मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामामुळे प्रेम जीवनातील नात्यात वेळ कमी द्याल. आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतीही गुंतवणूक करणे टाळा. जवळच्या मित्रांना भेटाल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
मेष – गुंतवणुकीतुन नफा होईल
हा आठवडा तुमच्यासाठी घरगुती कामातील समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे मन थोडे अस्वस्थ होईल. आयुष्यात अचानक अडचणी येतील. तुमची चिडचिड वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नाते बिघडू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ शुभ असेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. संपत्तीत वाढ होईल. गुंतवलेल्या पैशातून नफा होईल. मालमत्तेशी संबंधित वाद सोडवा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी व्यस्त असतील. कोणालाही उधार पैसे देणे टाळा अन्यथा नुकसान होईल. प्रेमसबंधांत हा आठवडा संमिश्र असेल. नात्यात कडू-गोड आठवणी तयार होतील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल.
भाग्यशाली रंग : सोनेरी
भाग्यशाली अंक : 1
वृषभ – आर्थिक नुकसान होईल
या आठवड्याची सुरुवात तुमची चांगली असेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही उत्साही असाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास घडतील. मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामामुळे प्रेम जीवनातील नात्यात वेळ कमी द्याल. वैवाहिक जीवनात चढ-उतार जाणवतील. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतीही गुंतवणूक करणे टाळा. जवळच्या मित्रांना भेटाल.
भाग्यशाली रंग : नारंगी
भाग्यशाली अंक : 5
मिथुन – नोकरीत नवी संधी
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि यशस्वी ठरेल. नियोजिक कामे पूर्ण करण्यासाठी आळस सोडावा लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाशी संबंधित नवीन संधी मिळतील. कामात अधिक व्यस्त दिसाल. कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागेल. या काळात घर किंवा इतर वस्तुंसाठी पैसा खर्च होऊ शकतो. तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर होईल आणि अपेक्षित यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. उत्पन्नासोबत खर्चही वाढेल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतील. प्रेमसंबंधात हा आठवडा शुभ ठरेल. जोडीदारासोबत चांगले जुळवून घ्याल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली रंग : करडा
भाग्यशाली अंक : 15
कर्क- प्रेम संबंधाच्या बाबतीत चढ-उताराचा सामना
या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी अडचणीचा ठरू शकते. मालमत्ता खरेदी करत असाल तर घाई करु नका, अन्यथा पश्चाताप करावा लागेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित मोठा निर्णय घेऊ नका. हितचिंतकाचा सल्ला घ्यावा. परदेशात करिअर करणाऱ्यांसाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल. कामात अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. नोकरदार महिलांसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकतात. प्रेम संबंधाच्या बाबतीत चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरुन वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.
भाग्यशाली रंग : जांभळा
भाग्यशाली अंक : 10
सिंह- नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल
या आठवड्याची सुरुवात शुभ असणार आहे. प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. ज्यामुळे तुमचे मन आनंदिक होईल. जमीन आणि इमारतीच्या खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होऊ शकते. चैनीच्या वस्तूवर जास्त पैसे खर्च होतील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. बहुप्रतिक्षित पदोन्नती किंवा इच्छित हस्तांतरण मिळून शकते. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्तोत्र असतील. कुटुंबातील लोकांसमोर प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायात अपेक्षिक नफा मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली रंग : तपकिरी
भाग्यशाली अंक : 2
कन्या – आरोग्याची काळजी घ्याल
कन्या राशीच्या लोकांनी हा आठवडा सावध राहाण्याचा असाल. अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. त्याचे रुपांतर वादात होऊ शकते. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहा. व्यवसायाशी संबंधिक लोकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असेल. या आठवड्यात व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक कामात अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर ठरतील. तुमचा खर्चाचा बजेट वाढेल. आरोग्याची काळजी घ्याल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
भाग्यशाली रंग : गुलाबी
भाग्यशाली अंक : 4
तुळ – प्रेम जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळावे.
तुळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात काही समस्या तयार होईल. तुम्हाला अपेक्षित सुखद परिणाम मिळतील. कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावू नका. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाशी संबंधित धावपळ करावी लागेल. अडकलेले पैसे काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावे लागेल. या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मोठी जबाबदारी कामात मिळेल. वडीलधाऱ्यांचे आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळीची वाट पाहावी लागेल. प्रेम जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळावे.
भाग्यशाली रंग : हिरवा
भाग्यशाली अंक : 8
वृश्चिक – आर्थिक नुकसान होईल
वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात सुरुवातीला कर्ज, आजार याबाबत गाफिल राहू नका. डोकेदुखी वाढू शकते. घर दुरुस्ती किंवा चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च होतील. पैसे उधार घ्यावे लागतील. या काळात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होईल. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अन्यथा काम बिघडू शकतात. ध्येय साध्य करण्यासाठी वरिष्ठांसोबत काम करावे लागेल. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. तुमच्या मनात निराशेची भावना तयार होईल. आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल. पार्टनरकडून सरप्राईज मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
भाग्यशाली रंग : लाल
भाग्यशाली अंक : 12
धनु- व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळेल. कुटुंबातील प्रिय व्यक्तीच्या येणाऱ्याने घरात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. व्यवसाय विस्ताराची इच्छा पूर्ण होईल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासून घ्या. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ अनुकूल असेल.
भाग्यशाली रंग : पिवळा
भाग्यशाली अंक : 3
मकर – कामात विचारपूर्वक निर्णय घ्या
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा महत्त्वाचा असेल. हितचिंतकांच्या मदतीने नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमच्याशी दयाळूपणे वागतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असेल. काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. कामाशी संबंधित मोठा निर्णय घ्याल. जोडीदार स्वत:ला सिद्ध करेल. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा कठीण असेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. ध्येय साध्य करण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. करिअरमध्ये बदल होतील. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा संवेदनशील असेल. नात्यातील गैरसमज दूर करा
भाग्यशाली रंग : निळा
भाग्यशाली अंक : 9
कुंभ- आर्थिक बजेट बिघडेल
हा आठवडा सुरुवातीला समस्या सोडवण्यात जाईल. कौटुंबिक समस्यांवर उपाय शोधाल. भावंडांकडून साथ न मिळाल्याने थोडे वाईट वाटेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक असू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची कामे पूर्ण होतील. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. तुमचा आदर वाढेल. तुमच्या निर्णायाचे कौतुक होईल. आठवड्याच्या शेवटी तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पैसे अधिक खर्च केल्याने बजेट बिघडेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा
भाग्यशाली रंग : काळा
भाग्यशाली अंक : 7
मीन – कामात घाई नको
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला असेल. कोणतेही काम करताना घाई करणे टाळा. कागदपत्रे पाहून मगच सही करा अन्यथा, अडचणीत सापडाल. वाहन काळजीपूर्वक चालवा. अतिरिक्त कामाचा ताण वाढू शकतो. बॉसच्या रागाला सामोरे जावे लागू शकते. स्वत:चे काम दुसऱ्यावर सोपवू नका. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना गुंतवणूक करणे टाळा. काम वेळेवर पूर्ण करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यावर परिणाम होईल. या काळात विचारपूर्वक खर्च करावा लागेल. भविष्यात पैसे उधार घ्यावे लागतील. प्रेमसंबंधांची तीव्रता विचारपूर्वक वाढवा. तुमचा वेळ जोडीदारासाठी आणि कुटुंबासाठी काढा.
भाग्यशाली रंग : पांढरा
भाग्यशाली अंक : 11