Cheapest 75 inch Smart TV: 75 इंचाच्या स्मार्ट टीव्हीचा विचार केला तर त्याची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे जाते. मात्र, आता थॉमसनने 75 इंच स्क्रीन आकाराचा स्वस्त स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
नवीन 75 इंच एअर स्लिम डिझाइन Google TV मध्ये 4k डिस्प्ले सपोर्ट आहे. टीव्ही डॉल्बी व्हिजन HDR+ सपोर्टसह येतो. यात डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रू सराउंड सपोर्ट आहे. यात 40W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकर आहे. टीव्ही 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजसह येतो. यात ड्युअल बँड (2.4 + 5 GHz) सपोर्ट आहे, जो Wi-Fi, Google TV सारख्या नवीन फिचर्ससह येतो. थॉमसनच्या 32 इंच QLED टीव्हीचे रिझोल्यूशन 1366 x768 पिक्सेल आहे. टीव्हीची कमाल ब्राइटनेस 550 nits आहे. हा टीव्ही Google Android TV सपोर्टसह येतो.
या आकर्षक फिचर्सचा टीव्हीमध्ये असेल समावेश
गुगल असिस्टंट: यामध्ये व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही टीव्ही कंट्रोल करू शकाल. तसेच, व्हॉईस कमांडच्या मदतीने कंटेंट सर्च करता येते.
व्हॉईस सर्च: क्वीक आणि सोप्या मार्गाने कंटेंट सर्च करण्यासाठी व्हॉईस इनपुट सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.
एआय अपस्केलिंग
यामध्ये, AI च्या मदतीने तुम्ही खराब दर्जाचा कंटेंट 4k किंवा त्याहून चांगल्या दर्जात प्ले करू शकाल. यामध्ये ॲडॅप्टिव्ह ब्राइटनेस फीचर देण्यात आले आहे. जिथून तुम्ही सभोवतालच्या लाइटींग कंडीशननुसार ब्राइटनेस ऍडजस्ट करू शकाल. तसेच यात AI सपोर्टेड HDR पॉवर्ड कलर आणि कॉन्ट्रास्ट रेश्यो यात मिळतो
स्मार्ट टीव्हीची किंमत
थॉमसनचा 75 इंचाचा स्मार्ट टीव्ही 10,000 पेक्षा जास्त ॲप्स आणि गेम्सचा अनुभव देतो. या स्मार्ट टीव्हीची किंमत 79,999 रुपये आहे, तर 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 11,499 रुपये आहे.