आजचे अंकभविष्य, 16 जुलै 2024 : मूलांक 5 धनप्राप्तीचा योग ! मूलांक 9 रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा होईल अनर्थ ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.

Numerology Prediction, 16 July 2024: ज्या लोकांचा आज 16 तारखेला वाढदिवस आहे त्यांचा मूलांक 7 असेल. मूलांक 7 चा राशिस्वामी केतु आहे. चला तर 7 मूलांक असणाऱ्यांसाठी तसेच मूलांक 1 ते 9 साठी मंगळवार कसा जाणार आहे ते जाणून घेऊया.

मूलांक 1 : अचानक धनलाभ

मूलांक 1 असलेल्यांना दिवस फार चांगला आहे. आज तुमच्याकडे आकस्मिक पैसे येण्याचे योग आहेत. तुमचे बोलणे आज नम्र राहील, त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. गरजेनुसारच पैसे खर्च करा, अन्यथा भविष्यात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. सरकारी अधिकाऱ्यांच्या ओळखी होतील. तुम्हाला आईवडिलांशी संबंध चांगले ठेवावे लागतील.
शुभ अंक – 19
शुभ रंग – केशरी

मूलांक 2 : आईच्या आशीर्वादाने कामे होतील

मूलांक 2 असलेल लोक आज फार भावनिक होतील. तुम्हाला कुटुंबीयांकडून प्रेम मिळेल. तुमच्या आईच्या आशीर्वादामुळे जीवनात मोठे बदल होतील. आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम आहे. आज भगवान शिवाला जल अपर्ण करावे, त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल.
शुभ अंक – 22
शुभ रंग – निळा

मूलांक 3 : विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा

मूलांक 3 असलेल्यांसाठी दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत मिळून धार्मिक स्थळी यात्रेचा विचार कराल. आजच्या दिवशी देवाणघेवाणीपासून दूरचा राहा. तुमचे ज्ञानवर्धक बोलणे सर्वांना प्रभावित करेल. आज तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील, पण तुम्ही आज सल्ला देण्याचे टाळले पाहिजे. आज श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची केलेली पूजा तुम्हाला चमत्कारिक असा लाभ देईल.
शुभ अंक -11
शुभ रंग – गुलाबी

मूलांक 4 : नशिबाची साथ मिळणार नाही

मूलांक 4 असलेल्यांना आज नशिबाची फारशी साथ मिळणार नाही. एखाद्या कामाचे नीट परीक्षण करूनच ते हाती घ्या, अन्यथा आर्थिक अडचणीत याल. आज तुमच्या आईची प्रकृती तुमच्यासाठी चिंतेचा विषय राहील. आईची अचानक बिघडलेली प्रकृती त्यांच्या शारीरिक समस्यांचे संकेत देत आहे, त्यावर वेळीच निदान करावे. आज कार्यक्षेत्रात तुम्ही फारशी बौद्धिक चमक दाखवू शकणार नाही, त्यामुळे फारसे प्रभावी काम होणार नाही. राजकीय संबंध असतील तर सावध राहावे, अन्यथा मानहानी होऊ शकते.
शुभ अंक – 6
शुभ रंग – केशरी

मूलांक 5 : पैसा मिळण्यासाठी शुभ वेळ

मूलांक 5 असलेल्यांना आजचा दिवस सामन्य राहील. आज तुमची बुद्धी फार चांगली चमक दाखवले, यातून इतर आणि तुम्ही असा भेद सहज दिसेल. पैसे मिळण्यासाठी आज फार चांगला दिवस आहे, त्यामुळे आज काही परिणामकारक पद्धतींवर विचार करा. आज तुम्ही बुद्धीवर विश्वास ठेवाल. कामात काही नवीन मार्गाचे वापर कराल.
शुभ अंक – 21
शुभ रंग – निळा

मूलांक 6 – प्रकृतीची पूर्ण काळजी घ्या

मूलांक 6 असलेल्यांना आज जोडीदारासोबत प्रेमळ वर्तणूक ठेवली पाहिजे. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. छातीशी संबंधिक काही समस्या त्रासदायक ठरू शकतात. आज एखाद्या महिलेमुळे त्रासातून सुटका होऊ शकते. नवीन कामांची सुरुवात आज केली तर फलदायी ठरेल.
शुभ अंक -19
शुभ रंग – पिवळा

मूलांक 7 : आर्थिक समस्या उभ्या राहतील

मूलांक 7 असलेल्यांना आजचा दिवस थोडा त्रासाचा राहील. आज दिवसभर एखाद्या आर्थिक समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल. आज पत्नीचे बोलणे तुमच्या मनाला लागू शकते, त्यामुळे तुम्हाला आज थोडे असहाय वाटू शकते. आज तुमच्या होत आलेल्या कामात अडचणी येतील. आज तुमची आई आणि पत्नी यांच्यात वाद वाढू शकतात. आज तांदळाची खीर बनवून कुटुंबीयांसोबत खावी.
शुभ अंक-14
शुभ रंग – हिरवा

मूलांक 8 : तणाव राहील

मूलांक 8 असलेल्यांना एखादे महत्त्वाचे काम करताना मोठ्या निराशेला तोंड द्यावे लागू शकते. आज तुम्हाला भौतिक आणि आर्थिक सुविधांत काही त्रास होऊ शकते. आज तुम्हाला मानसिक तणाव जास्त जाणवेल. आज काही अनावश्यक समस्यांत अडकू शकता. कार्यस्थळी तुम्ही केलेल्या कामात सर्वजन उणिवा शोधतील, त्यामुळे तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील.
शुभ अंक -14
शुभ रंग- आकाशी

मूलांक 9 : आज रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. आज पैशांची आवकही सामान्य राहील. आज तुम्ही भावांसोबत संपत्तीच्या बाबतीत विचार करू शकता. आज घाईगडबडीत कोणतेही काम करू नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. एखाद्या कामात भावांचा सल्ला आवश्य घ्या.
शुभ अंक – 18
शुभ रंग-लाल

Source link

16 July 202416 जुलै 2024Numerology for 16 July 2024numerology horoscope in marathiNumerology PredictionTodays Numerology 16 July in marathiअंक ज्योतिष दैनिक भविष्यवाणीआजचा शुभ अंकआजचे अंकज्योतिषकसा असेल माझा दिवस?कोणते अंकशास्त्र भाग्यवान आहे? व्यवसायात नफा होईल?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?
Comments (0)
Add Comment