येरवडा कारागृहातून पळाला खुनाच्या गुन्ह्यातील

पुणे,दि.१६:- खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यी येरवडा कारागृहातील खुल्या कारागृहातून पळून गेला आहे हि घटना शनिवारी सायंकाळी समोर आली आहे. येरवडा पोलिस या पळून गेलेल्या कैद्याचा शोध पोलीस घेत आहेत.

आत्माराम ऊर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय ३४) असा झालेल्या कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवीपाडा येथील रहिवासी आहे. त्याने २००९ मध्ये देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी भवरला १० जुलै २०१२ रोजी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

भवरची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याची वर्तणूक चांगली असल्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. कारागृहातील पोलिस कर्मचारी तौसिफ सय्यद यांनी शनिवारी सायंकाळी कैद्यांची हजेरी घेतली. त्यावेळी भवर आढळून आला नाही.

कारागृह पोलिसांनी त्याचा खुल्या कारागृहात शोध घेतला. त्यानंतर कारागृह अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भवर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याच्या शोध घेत आहेत

Comments (0)
Add Comment