पुणे : झुंजार व झुंजार नामा ऑनलाइन – पुणे शहरातील येरवड्यातील गोल्फ चौकाजवळ पूर्ववैमनस्यातून एका गुन्हेगाराचा तिघांनी कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना बुधवारी (दि.१७) रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (वय-23 रा. जयप्रकाश नगर, येरवडा,) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
याप्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय-44), स्वप्निल प्रवीण आचार्य (वय-28), रवी रामचंद्र आचार्य (वय-35 सर्व राहणार येरवडा, यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत गौरी धर्मेंद्र शिंदे वय 35 राहणार जयप्रकाश यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवस याचे आचार्य यांच्या संग पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली होती. व पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुधीर हा गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायका शेजारी उभ्या असताना त्याला तिघांनी त्याच्यावर कोयत्याने डोक्यात व शरीरावर वार केले. या हल्ल्यात सुधीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले