WhatsApp Favorite Feature: व्हॉट्सॲपने चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आणले ‘फेव्हरेट फिल्टर’ फीचर; रीसेंट ॲक्टिव्हिटी शोधणे होणार सोपे

WhatsApp Favorite Feature Launched : व्हॉट्सॲपने चॅटिंग आणि कॉलिंगसाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले सर्वात आश्चर्यकारक फीचर आणले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर ज्यांच्याशी जास्त बोलले जाते ते कॉन्टॅक्ट, चॅट आणि कॉल शोधणे सोपे होणार आहे. मार्क झुकरबर्गने त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलवर या नवीन फीचरच्या स्टेबल रोलआउटबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
व्हॉट्सॲप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, कंपनीने शेवटी सर्वांसाठी आवडते ‘फेवरेट फिल्टर (Favourite Filter) फीचर’ आणण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲपमधील या नवीन फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर ज्यांच्याशी जास्त बोलले जाते ते कॉन्टॅक्ट, चॅट आणि कॉल शोधणे सोपे होणार आहे. मार्क झुकरबर्गने त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलवर या नवीन फीचर बद्दलल माहिती दिली. कंपनीने ब्लॉग पोस्टमध्येही नवीन फीचरची माहिती दिली आहे. ब्लॉग पोस्टमध्ये शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार तुम्ही ‘फेव्हरेट चॅट फिल्टर’ आणि ‘फेव्हरेट इन कॉल्स’ पर्याय पाहू शकता. हे अपडेट लवकरच सर्व युजर्सपर्यंत पोहोचतील. फेवरेट चॅट लिस्ट स्क्रीनमध्ये ऑल,अनरिड आणि ग्रुप फिल्टर आहेत. त्याच वेळी, कॉल टॅबमध्ये, रीसेंट कॉल्सच्या वर फेव्हरेट लिस्टेड केल्या जातील. कंपनी टप्प्याटप्प्याने हे नवीनतम अपडेट आणत आहे. अशा परिस्थितीत, येत्या काही दिवसांत ते प्रत्येक युजरपर्यंत पोहोचेल.

Google Play Store वरून करा अपडेट इंस्टॉल

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या फोनमधील Google Play Store किंवा App Store उघडून WhatsApp चे नवीन अपडेट तपासू शकता. लक्षात ठेवा की, अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतरही, हे फीचर ॲपमध्ये रिफ्लेक्ट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

असे वापरा नवीन फेव्हरेट फिल्टर

  • नवीनतम अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर, WhatsApp उघडा आणि चॅट स्क्रीनच्या टॉपला नवीन फेवरेट फिल्टर पहा.
  • जर हे फीचर तुमच्या डिव्हाईसमध्ये आले असेल तर त्यावर टॅप करा.
  • येथे Add फेवरिट वर टॅप करा आणि कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप निवडा.
  • कॉल्स टॅबमध्ये फेव्हरेट जोडण्यासाठी, तुम्हाला तीच प्रक्रिया करावी लागेल.
  • तुम्ही फेव्हरेट फिल्टरमध्ये कधीही कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप रिमूव्ह करू शकता.

व्हॉट्सॲप आणत आहे नवनवीन फीचर्स

व्हॉट्सॲप वेगाने नवीन फीचर्स आणत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये, बीटासह स्थिर आवृत्तीसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये आली आहेत. आता यूजर्स व्हॉट्सॲपच्या मेटा एआयबद्दल खूप उत्सुक आहेत. कंपनीने अलीकडेच व्हॉट्सॲपमध्ये एआय स्टुडिओमध्ये एंट्री केली आहे . हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. त्याची स्थिर आवृत्तीही लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

WhatsAppWhatsApp featuresअशी बघा व्हॉट्सॲपवरची रीसेंट ॲक्टिव्हिटीकाय आहे व्हॉट्सॲपचे नवीन अपडेट्सव्हॉट्सॲपचे फेव्हरेट फीचर म्हणजे काय
Comments (0)
Add Comment