kondhwa जांच टीम ने पैदल चलने वालों से जबरदस्ती मोबाइल फोन छीनने वाले आरोपियों को किया बेनकाब

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

न्यूज संपर्क 70306 46046

Pune-कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे शहर परिसरात रात्रीच्यावेळी पायी चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती.

दिनांक ०८/०६/२०२४ रोजी रात्रौ ००/१५ वा. च्या सुमारास ताहेरी क्लिनीकसमोर, साळुंखे विहार रोड, कोंढवा खुर्द, पुणे येथे फिर्यादी रय्यान अहमद ईब्राहीम, वय-१७ वर्षे, रा. फ्लॅट नं.०६, रोशमा रिजन्सी अपार्टमेन्ट, साळुंखे विहार रोड, साळुंखे विहार टेलिफोन एक्स्चेंज समोर, कोंढवा खु. पुणे हे जेवण करून वॉकिंग करीत असताना एका दुचाकी गाडीवरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या हातातून त्यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले होते त्या अनुषंगाने कोंढवा पोस्टे येथे गु.र.नं. ६६२/२०२४, भा.दं.वि. कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कोंढवा तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार निलेश देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा मोबाईल फोन हा इसम नामे उमर सलीम शेख, रा. गल्ली नं ०१, पिताश्री आश्रम जवळ, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे याने केल्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर तपास पथकाचे पो. अंमलदार शाहिद शेख व लक्ष्मण होळकर, यांनी सदर आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या अप्लवयीन साथीदारासह केल्याचे मान्य केलेअसून सदर आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली ४०,०००/- रू किं ची एक होंडा शाईन दुचाकी गाडी तसेच ८६ हजार रू किंमतीचे १० मोबाईल फोन असा एकुण १ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून मार्केटयार्ड पोस्टे गु.र.नं. ११९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४) हा गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे.

वरिल नमुद कारवाई मा. अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, साो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा. गणेश इंगळे साो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्रीमती रूणाल मुल्ला, मा. पोलीस निरीक्षक साो., गुन्हे, श्री मानसिंग पाटील, मा. पोलीस निरीक्षक साो., गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार निलेश देसाई, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार शाहीद शेख, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार सुजित मदन, पोलीस अंमलदार सागर भोसले, व पोलीस अंमलदार सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment