पुणे येथील शेअर ब्रोकरचे अपहरण करुन खंडणी मागणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

शेअर ब्रोकरचे अपहरण करणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१६)जुलै २०२४ रोजी विशाल प्रमोद वारके रा. भुसावळ जि. जळगाव यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना मोबाईल व्दारे माहीती दिली की, त्यांचे जावाई नितीन भाष्कर सरोदे, वय ४४ रा. शिंदे वस्ती रावेत जि.पुणे हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक एजंट (ब्रोकर) म्हणुन काम करतात, दि.१५/७/२४ रोजी एका मोठया पार्टीने शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी बोलावले असल्याने त्यांना भेटण्याकरीता संगमवाडी परीसरामध्ये जात असल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगीतले होते परंतु त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्यांचे पत्नीस मोबाईल व्दारे कळविले ते “उदया पर्यंत घरी येतील व कोणास काही सांगु नको” असे सांगीतले. तसेच त्यावेळी ते घाबरत
घाबरत बोलत होते. त्यानंतर नितीन सरोदे यांनी त्यांचा मेव्हना विशाल वारके यास फोन करुन प्रथम १५ लाख व नंतर २० लाख रुपये अकोट येथे घेवुन येण्यास सांगितले आणि पैसे का व कशासाठी हवे हे काही विचारु नको असे सुध्दा घाबरत घाबरत सांगितले. यावरुन संशय आल्याने  विशाल वारके यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना तशी माहीती मोबाईल फोनव्दारे संपर्क करुन दिली.

घटनेची गांभीर्य पाहता पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशान्वये नितीन सरोदे व त्यांच्या वाहनाचा जिल्हयात शोध घेणे सुरु केले. त्याव्दारे मिळालेल्या माहीती नुसार ठाणेदार पो.स्टे. पथ्रोट.सुनिल पाटील व पो.उप.नि.गणेश मोरे यांनी परतवाडा अंजनगाव रस्त्यावर तातडीने नाकाबंदी करुन नितीन सरोदे यांचे
वाहन मारुती सुझुकी ब्रेझा क्र. एम.एच.१४ जे. एम. ८६७० हे थांबविले व तपासणी केली असता  नितीन सरोदे व इतर दोन इसम  डॉ. सुहास भांबुरकर व अल्पेश साहेबराव गुडधे यांचेसह वाहनामध्ये आढळले. त्यांना पो.स्टे.पथ्रोट येथे आणल्यावर सखोल विचारपुस केली असता समजले की, डॉ. सुहास सुभाष भांबुरकर हे मुळचे विहीगाव ता.अंजनगाव येथील रहीवासी असुन सध्या ते पुणे येथे दवाखाना चालवितात. त्यांनी दोन तिन वर्षापूवी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी नितीन सरोदे यांना ५० लाख रु दिले. ज्यामध्ये डॉ. सुहास भांबुरकर यांना तोटा झाला. सदर नुकसानास नितीन सरोदे हेच जबाबदार असल्याचा समज डॉ. भांबुरकर यांना झाला त्यांनी आपले पैसे परत करण्याचा तगादा नितीन सरोदे यांचेकडे लावला. सरोदे यांनी पैसे परत न केल्यामुळे डॉ. सुहास भांबुरकर यांनी नितीन सरोदे यांना दि.१५/०७/२४ रोजी पुणे येथील संगमवाडी परीसरात बोलाविले व त्यांच्याच गाडीत बसुन गाडी अहमदनगर रोडने घेण्यास सांगीतले. थोडया अंतरावर डॉ. सुहास भांबुरकर यांचा मित्र अल्पेश साहेबराव गुडधे वय ३१ रा. पांढरी ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती हा गाडीत बसला. त्यानंतर डॉ. भांबुरकर व अल्पेश यांनी नितीन सरोदे यांच्या मानेला चाकु लावुन पैशाची मागणी केली. व प्रतीसाद न मिळाल्याने नितीन सरोदे यांचे हात बांधुन चाकुचा धाक दाखवुन त्यांना गाडीत बसवुन अमरावती कडे आणले.त्यानंतर नितीन सरोदे यांना त्यांच्याच मोबाईल व्दारे कुटुंबियांशी संपर्क करुन २० लाख रु घेऊन अकोट परीसरात बोलावण्याचे सांगुन न आणल्यास मारण्याची धमकी दिली. परंतु अकोट पोहचण्या पुर्वीच अमरावती ग्रामीण पोलिसांनी त्यांना पथ्रोट येथे थांबविल्याने त्यांचा पैसे उकळण्याचा डाव फसला.

सदर प्रकरणी सखोल चौकशी केली असता त्यामध्ये भुषण मनोहर तायडे वय २८ रा. मल्हारा ता. अचलपुर याचा सुध्दा सहभाग
असल्याचे लक्षात आले.घटने संदर्भात नितीन सरोदे यांचे मावस भाऊ संदीप अशोक भोळे, वय ४१ रा. गणेश नगर रावेत पुणे.
यांचे तक्रारी वरुन १) डॉ. सुहास सुभाष भांबुरकर, वय ३८ रा. विहीगाव ह. मु. पुणे २. अल्पेश साहेबराव गुडधे, वय ३१ रा.पांढरी ता.अंजनगाव ३. भुषण मनोहर तायडे वय २८ रा. मल्हारा ता. अचलपुर यांचे विरुध्द पो.स्टे.येरवडा, पुणे, येथे भारतीय न्याय संहीतेचे कलम १४०(३),१४२,३०८(४),३०८ (५), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व आरोपींना येरवडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक,पंकज कुमावत,उपविभागिय पोलिस अधिकारी,अंजनगाव
गुरुनाथ नायडु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा किरण वानखडे, सपोनि. सुनिल पाटील, ठाणेदार पो.स्टे.पथ्रोट यांचे नेतृत्वात स.पो.नि सचिन पवार स्था. गु.शा व पथक, पोस्टे परतवाडा डी.बी.पथक,पोस्टे पथ्रोट चे पो.उपनि.गणेश मोरे,पोहवा अशोक दहीकर, नरेश धाकडे, सचिन सालफळे, विजय गायकवाड,चालक नितीन ठाकरे यांनी केली

Comments (0)
Add Comment