महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
कपडयांचे गोडाऊन फोडुन चोरी करणा-या ०५ महीलांची टोळी जेरबंद करून १,२०,५८०/- रूपये किंमतीचा मुददेमाल गुन्हे शाखा युनीट १ ने केला हस्तगत….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरामध्ये बाजारपेठांमधुन चोरी, घरफोडी च्या घटना घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपींचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या
अनुषगांने पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहा पोलिस आयुक्त,गुन्हे शाखा संदिप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
दि. १५/०७/२०२४ रोजी फ्लॅट नं. ०१, कुर्डकर नगर, रवीशंकर मार्ग, नाशिक येथील गोडाऊनचे कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करून गोडावुन मधे असलेले २,००,०००/- रूपये किंमतीचे नवीन कपडे चोरुन नेले बाबत मुंबई नाका पोलिस ठाणे येथे गु.र.नं. २१४ / २०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (अ), ३३४ (१) प्रमाणे दाखल झाला होता. त्याअनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असतांना दिनांक १७/०७/२०२४ रोजी पोहवा.विशाल काठे यांना वर नमुद चोरी भिमवाडी गंजमाळ येथील ०५ संशयीत महीलांनी केली असुन चोरलेले कपडे गंजमाळ झोपडपटटी येथे विक्री केले असल्याची गुप्त खात्रीशिर बातमी मिळाली होती त्यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, सफौ सुगन साबरे, पोहवा प्रविण वाघमारे, शरद सोनवणे, महेश साळुंके, विशाल काठे, संदिप भांड, नापोशि विशाल देवरे, प्रशांत मरकड, पोशि मुख्तार
शेख, जगेश्वर बोरसे, राजेश राठोड, राम बर्डे, व मपोशि अनुजा येलवे अशांचे पथक तयार करून त्यांनी गंजमाळ झोपडपटटी येथे सापळा लावून चोरी केलेले कपडे विक्री करणा-या ०५ संशयीत महीलांना ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन १,२०,५८० /- रूपये किंमतीचा मुददेमाल
त्यात वेगवेगळे नवीन शर्ट, पॅन्ट, बनियन, अंडरवेअर वगैरे असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त(गुन्हे), संदिप मिटके,गुन्हे शाखा युनीट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, सफौ सुगन साबरे, पोहवा प्रविण वाघमारे, शरद सोनवणे, महेश
साळुंके, विशाल काठे, धनंजय शिंदे, संदिप भांड, नापोशि विशाल देवरे, प्रशांत मरकड, पोशि मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे, राजेश राठोड, राम बर्डे, मपोशि अनुजा येलवे यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.