जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही तासाचे आत गोंदीया पोलिसांनी केले जेरबंद…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  अवघ्या काही तासाचे आता उलगडा करुन दोन आरोपींना केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) जुलै 2024 रोजी सायंकाळी 6.40 वाजता चे सुमारास यातील जखमी गंगाधर विजय चांद्रिकापुरे वय 40 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यास सिंगलटोली मैदान दर्ग्याजवळ दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करून विनाकारण  धारदार हत्याराने जखमीच्या पोटावर,छातीवर,शरीरावर वार करून गंभीररित्या जखमी करुन जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा यातील जखमीचा भाऊ नितीन विजय चांद्रिकपुरे वय 38 वर्ष रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यांचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक- 426/2024 कलम 109, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दि 17-07-2024 रोजी चे11.09 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलिस निरीक्षक गोंदिया शहर यांना दिले होते

त्यांचे सुचना व  आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी,  गोंदिया, रोहिणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर चे पोलिस निरीक्षक .किशोर पर्वते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  दिनेश लबडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पथक आणि गोंदिया शहर चे गुन्हे प्रकटीकरण पथक अशी विविध पथके सदर प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता नेमण्यात आलेली होती तसेच यातील आरोपीचे शोधाकरिता गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते व अज्ञात आरोपींचा शोध करीत असतांना घटनास्थळावरून प्राप्त माहीती परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी 1) प्रशांत उर्फ दद्दू सुरेश वाघमारे वय 30 वर्षे रा. सिंगलटोली, गोंदिया यांस डोंगरगड वरून स्थागुशा चे पथकाने तसेच 2) अविनाश ईश्वर बोरकर वय 42 वर्षे रा. लक्ष्मीनगर गोंदिया यास रामटेक यास गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे ..

नमूद दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपूस चौकशी केली असता प्राथमिक तपासात यातील आरोपी क्र. 2 अविनाश बोरकर यांनी सांगितले की जखमी गंगाधर आणि आरोपी हे मिञ असून जखमी हा नेहमी आरोपी अविनाश चे पत्नीची बदनामी करीत होता त्याचा राग अगोदर पासून अविनाश चे मनात होता. घटनेदिवशी सुध्दा तिघेही दारू पित असताना जखमी हा अविनाश चे पत्नीची बदनामी करीत असल्याने दारूचे नशेत राग आल्याने स्वतः जवळ असलेल्या चाकूने जखमी गंगाधर यास जिवानिशी ठार करण्याचा उद्देश्याने जखमीचे शरीरावर वार करून जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले असून प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे तसेच आरोपी क्र. 1 प्रशांत उर्फ दद्दू वाघमारे यास आज मा.न्यायालया समक्ष पेश केले असता मा.न्यायालयाने दोन्ही आरोपीचा दिनांक 22/07/2024 रोजी पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास स.पो.नि. कदम पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी,गोंदिया  रोहिणी बानकर, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश  लबडे, यांचे नेतृत्वात स.पो.नि. विजय शिंदे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तसेच पोलिस निरीक्षक किशोर पर्वते पो.ठाणे गोंदिया शहर, यांचे नेतृत्वात- स. पो.नि. सोमनाथ कदम, आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अधिकारी अंमलदार यांनी कामगिरी केलेली आहे.

Comments (0)
Add Comment