Boat Smart Ring Active Launched: boAt ने आजपर्यंतची सर्वात स्वस्त स्मार्ट रिंग लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट डिझाइनसह अप्रतिम फीचर्स मिळतील. boAt स्मार्ट रिंग ॲक्टिव्ह भारतात लॉन्च करण्यात आली आहे. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त स्मार्ट रिंगांपैकी ही एक आहे. याशिवाय, याचे डिझाइन देखील खूपच अप्रतिम आहे
किंमत व उपलब्धता
बोट स्मार्ट रिंग ॲक्टिव्हची किंमत 2,999 रुपये आहे आणि ती 20 जुलैपासून Amazon.in, Flipkart आणि boAtच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. ही स्मार्ट रिंग 7 ते 12 आकारात उपलब्ध असेल. मिडनाईट ब्लॅक, रेडियंट सिल्व्हर आणि गोल्ड या तीन रंगांमध्ये हि रिंग उपलब्ध असणार आहे.
बोट स्मार्ट रिंग ॲक्टिव्हचे फीचर्स
- ‘बोट स्मार्ट रिंग ॲक्टिव्ह’ ही एक नवीन स्मार्ट रिंग आहे जी स्टेनलेस स्टीलची आहे आणि त्वचेसाठी सॉफ्ट आहे. कंपनी म्हणते की,हि रिंग घालण्यासाठी खूप हलकी आहे.
- हि रिंग 6 वेगवेगळ्या आकारात येते.
- हि तुमची झोप, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी आणि दैनंदिन ॲक्टिव्हिटीजचा फॉलोअप घेऊ शकते.
- याशिवाय, हि 20 प्रकारचे खेळ देखील ट्रॅक करू शकते आणि ब्लूटूथद्वारे कनेक्ट होते.
- यात टच आणि एक्सप्रेशद्वारे कंट्रोल करण्याची सुविधा देखील आहे.
- ‘बोट स्मार्ट रिंग ॲक्टिव्ह’ धूळ, घाम आणि पाणी शिंपडून देखील खराब होत नाही.
- हि रिंग ‘बोट रिंग ॲप’ नावाच्या ॲपसह कार्य करते.
- एका चार्जवर ही रिंग 5 दिवस काम करू शकते असा कंपनीचा दावा आहे.
boAt Nirvana Space TWS इयरबड्स
boAt ने नुकतेच Nirvana Space TWS इयरबड्स भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. 360°स्पेटियल ऑडियोसह सुसज्ज, इअरबड 100 तासांचा प्लेटाईम देतात.किंमतीबद्दल बोलायचे झाले तर boAt Nirvana Space TWS Earbuds ची किंमत 1,999 रुपये आहे. हे इयरबड्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतात. boAt Nirvana Space TWS इअरबड्समध्ये 11mm ड्रायव्हर आहेत. इयरबड्समध्ये boAt च्या सिग्नेचर साऊंडसह डायमंड सारखे कार्बन ड्रायव्हर्स आणि EQ मोड समाविष्ट आहे, जे स्पष्ट आणि कस्टमाईजेबल ऑडिओ वितरीत करते. बॅकग्राउंड साऊंड कमी करण्यासाठी ऍक्टिव्ह व्हॉईस कॅन्सलेशन (ANC) 32dB पर्यंत समाविष्ट केले आहे आणि क्वाड-माइक ENX टेक्निकने कॉल क्वालिटी सुधारली आहे. AMI टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने 360° स्पेटियल ऑडियो विकसित केला गेला आहे, जो एक उत्तम साऊंड एक्सपेरियन्स प्रोव्हाईड करतो.