मोबाईल दुकान फोडणारे भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

मोबाईल दुकान फोडणारे भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या जाळयात भद्रकाली पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मालमत्ते संबंधी घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशीत केले होते.

त्यानुसार पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष नरूटे, पोलिस निरीक्षक (प्रशासन), विक्रम मोहीते, यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि  वसंत पवार यांचे अधिपत्याखाली सफौ यशवंत गांगुर्डे व पथकातील पोलिस अंमलदार असे भद्रकाली पोलिस ठाणेकडील घरफोडी चोरीबाबत दि. ०३/०७/२०२४ रोजी दाखल असलेला गुन्हा रजि.नं. २२९/२०२४ भा. न्या. संहीता कलम ३३१ (३), ३३१(४),३०५(A) अन्वये या गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असतांना गुन्हे शोध पथकाचे सफौ यशवंत गांगुर्डे व पोशि दयानंद सोनवणे यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी येण्या-जाण्याचे मार्गावर तांत्रिक पध्दतीने तपास करून पाहीजे असलेल्या आरोपीं बाबत माहीती प्राप्त करून सदर गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न केले होते. त्यानंतर सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी हे मोबाईल विक्रीकरीता अंबड परीसरात येणार असल्याची पथकास माहीती प्राप्त झाल्याने सपोनि वसंत पवार व पथक यांनी अंबड पोलिस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे मदतीने सदर गुन्हयातील आरोपी  सोहेल उर्फ बाबु पप्पु अन्सारी, वय ३२ वर्षे, रा. भारतनगर, वडाळा, नाशिक यास अंबड परीसरातुन ताब्यात घेतले असुन व त्याचा साथीदार वाजीद जैद शेख हा पळुन गेला होता. त्यानंतर पोहवा  कयुम सैयद यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे गुन्हयातील पाहीजे असलेला दुसरा आरोपी वाजीद जैद शेख, वय १९ वर्षे, रा. पाण्याचे टाकी मागे, नानावली,भद्रकाली, नाशिक यास क्युरी मानवता हॉस्पीटल परीसर, मुंबई नाका, नाशिक येथुन ताब्यात घेवुन दोन्ही आरोपींना  दि. १६/०७/२०२४ रोजी गुन्हयात अटक केली आहे.

सदर आरोपीतांकडे केलेल्या तपासा दरम्यान त्यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न होवुन त्यांचेकडुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले वेगवेगळया कंपन्यांचे नविन व जुने असे ५२,००० /- रू किंमतीचे एकुण १८ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि  वसंत पवार हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त परीमंडळ १ किरणकुमार चव्हाण, सह पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव,वरीष्ठ पोलिस निरीक्षक  गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक, (गुन्हे) संतोष नरूटे, पोलिस निरीक्षक (प्रशासन)विक्रम मोहीते, भद्रकाली पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि वसंत पवार, सफौ यशवंत गांगुर्डे, पोहवा  सतिषससाळुंके, कय्युम सैय्यद, नापोशि अविनाश जुंद्रे, पोशि दयानंद सोनवणे, निलेश विखे,नारायण गवळी अशांनी पार पाडली आहे.

Comments (0)
Add Comment