चार कोटीची खंडणी मागणार्या मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अपहरण करुन ४ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथुन गुंडाविरोधी पथकाने शिताफीने घेतले ताब्यात….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) फेब्रुवारी २०२४ रोजी यातील फिर्यादी रुपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथुन ६ अनोळखी इसमांनी यातील फिर्यादी  रुपचंद भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबुन ४ कोटी १० लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून त्रंबकेश्वर, वाडीवान्हे, मुंबई रोड अशा वेगवेगळया ठिकाणी घेवुन जावुन खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देवुन मागीतलेल्या रक्कमेतील २ कोटी १० लाख रुपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी यांना सोडुन फिर्यादी यांचा भाऊ विष्णु भागवत याचे अपहरण करुन घेवुन गेले यावरुन सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर ६९ / २०२४ भादंविक ३६४ (अ) ३४ प्रमाणे दिनांक २९/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले होते

सदर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, यांनी गुन्हे शाखेस आदेशीत करुन पोलिस उपायुक्त(गुन्हे)यांनी त्यासंबंधी गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते त्यानुसार सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत हे नाशिकरोड परिसरात गस्त करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार राकेश
सोनार हा गुन्हा घडल्यापासुन मध्यप्रदेश व मुंबई, पुणे या भागात आपले अस्तित्व लपवुन फिरत असुन सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाडया खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो.

सदरची माहिती पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, यांना देवुन त्यांनी तात्काळ दि. १८/०७/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि  ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी,
डी. के. पवार, गणेश भागवत, प्रविण चव्हाण यांना पुणे येथे रवाना केले. पोलीस पथकाने पिंपरी चिंचवड, पुणे येथील हिंजवडी परिसरात जावुन जुन्या गाडया खरेदी-विक्री करणारे व गॅरेज काम करणारे इसम यांचेकडे चौकशी करुन आरोपी राकेश सोनार हा सुसगाव, हिंजवडी येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती काढली असता सुसगाव येथील स्थानिक लोक व गुप्तबातमीदार यांचेकडुन भाडोत्री राहणारे इसमांची माहिती घेवुन तांत्रिक व मानवी कौशल्य
वापरुन दि. १९/०७/२०२४ रोजी श्री समर्थ कृपा बंगला, भगवती नगर, सुसगाव, हिंजवडी पुणे येथुन पाहिजे असलेला आरोपी राकेश आबालाल सोनार वय – ३१ वर्षे रा. पाटील पार्क, चुंचाळे शिवार, सातपुर नाशिक यास शिताफीने ताब्यात घेवुन नाशिक येथे आणुन पुढील तपासकामी सरकारवाडा पोलिस स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक,पोलिस उपायुक्त(गुन्हे)  प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके,यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, मलंग गुंजाळ, राजेश सावकार, सुनिल आडके, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड, मनिषा कांबळे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

Comments (0)
Add Comment