Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लवकरच बाजारात लाँच केला जाऊ शकतो. कारण हा हँडसेट मलेशियन आणि भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. या हँडसेटला मलयेशियन स्टँडर्ड अँड इंस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (SIRIM) कडून सर्टिफिकेशन मिळालं आहे. या लिस्टिंगनुसार सॅमसंगचा आगामी फोन 5जी डिवाइस नाही. तसेच लवकरच हा फोन जागतिक बाजारात येईल हे नक्की.
FCC सर्टिफिकेशनवरून फोनच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली होती जो SM-A065F/DS आहे. तसेच इथून समजले होते की फोनमध्ये ड्युअल-बँड Wi-Fi आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी दिली जाईल. तसेच हा फोन 4G LTE नेटवर्कला सपोर्ट करेल म्हणजे हा एक 5जी स्मार्टफोन नाही.
Samsung Galaxy A06 को गीकबेंचवर देखील दिसला आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. साधारणतः या प्रोसेसरचा वापर बजेट स्मार्टफोन्समध्ये केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार Galaxy A06 मध्ये 4 जीबी रॅम मिळण्याची अपेक्षा आहे आणि हा आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 14 ओएसवर चालेल.
अलीकडेच आलेले सॅमसंगचे फोन
Samsung च्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्सना भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीच्या Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6साठी प्री-ऑर्डर्स सुरु झाल्यानंतर 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी हे फोन्स ऑर्डर केले आहेत. ही संख्या सॅमसंगच्या आधीच्या फोल्डेबल स्मार्टफोन सीरीजच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढली आहे.
Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 10 जुलैला लाँच करण्यात आले होते. त्याचबरोबर देशात या स्मार्टफोन्ससाठी प्री-ऑर्डर्स सुरु झाल्या होत्या. या स्मार्टफोन्स सोबतच Galaxy Watch Ultra, Galaxy Watch 7, Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro की 24 जुलै पासून विक्री सुरु होईल. Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 मध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8 Gen 3 देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संबंधित फीचर्स देखील आहेत.