दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली परप्रांतीय टोळी गुन्हे शाखेने केली जेरबंद…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील 4 परप्रांतीय आरोपी खंजर व दरोड्याच्या साहित्यासह ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कामगिरी

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांना काही संशयित इसम हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती भेटली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 18/07/2024 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास गुळ मार्केट ते गांधी चौक जाणाऱ्या रोडवरील जुने रेल्वे स्थानकच्या पार्किंग मधील सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे अंधारात दबा धरून थांबलेल्या  संशयित इसमांवर अचानक छापा टाकून इसमांची व त्यांच्याकडील बॅगाची झडती घेतली. पथकाला झडतीत आरोपी
1) मोहम्मद हमीद उर्फ गबरू मोहम्मद मुसाहिद, वय 44 वर्ष, राहणार शहाजमाला, तालुका मवाना, जिल्हा मेरठ, राज्य उत्तर प्रदेश.2) मोहम्मद सलमान मोहम्मद शौकीन, वय 30 वर्ष राहणार शहाजमाला, तालुका मवांना जिल्हा मेरठ, राज्य उत्तर प्रदेश.3) मोहम्मद नदी मोहम्मद बुदुखा, वय 27 वर्ष, राहणार मसूरी तालुका जिल्हा गाझियाबाद ,राज्य उत्तर प्रदेश.4) मोहम्मद नदीम मोहम्मद कल्लू, वय 23 वर्ष, राहणार मसूरी तालुका जिल्हा गाझियाबाद, राज्य उत्तर प्रदेश.5) मुस्तकीम अहमद मुरसलीम, वय अंदाजे 25 वर्ष, राहणार डासना, तालुका जिल्हा गाझियाबाद राज्य उत्तर प्रदेश (फरार)

हे कोणत्यातरी दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीने येवुन दरोडा टाकण्याचे साहित्य ज्यात एक धारदार खंजीर, लोखंडी कटावणी, मिरची पावडर व मोबाईल असे एकूण किंमत 45,600/-रु.चे मुद्देमालासह दरोडा टाकण्याचे तयारीत असताना मिळुन आले.
सदर प्रकरणी कलम 310(4), 310(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे पो.स्टे. गांधी चौक येथे पोलीस अमलदार खुर्रम काझी यांनी दिलेल्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री.सोमय मुंडे,पोलीस अधीक्षक लातूर,श्री अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनात श्री. संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री संजय भोसले, पोलीस हवालदार राहुल सोनकांबळे खुर्रम काझी, साहेबराव हाके ,दीनानाथ देवकते, मोहन सुरवसे, यशपाल कांबळे, राजेश कंचे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, सुरेश कलमे, मनोज खोसे, राहुल कांबळे, संतोष देवडे, चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस अधिकारी आमदार करीत आहेत.

Comments (0)
Add Comment