बाणेर-पाषाण लिंक रोडवर डिजिटल कंटेन्ट क्रिएटर म�

पुणे,दि.२०:- बाणेर-पाषाण लिंक रोड येथे एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या महिलेचा दोन किमीपर्यंत पाठलाग करुन तिला मारहाण करण्यात आली. आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती त्या महिलेने एका सोशल मीडियावर व्हिडिओतून दिली आहे. ज्यामध्ये तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत असल्याचं समोर आलं आहे. जेरलिन डिसिल्वा असं या महिलेचं नाव आहे.

https://www.instagram.com/reel/C9pjShVteo9/?igsh=MTg2NTg2MnVmZTRqYg=

व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका कार चालकाने तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेला तिची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले . यावेळी आरोपी ड्रायव्हरने आपली कार थांबवली आणि खाली उतरुन त्याने जेरिन यांच्या चेहऱ्यावर जोरदार बुकी मारल्यान तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. महिलेसोबत असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात कारचालकाने तिला मारहाण केली

याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहे.

Comments (0)
Add Comment