सोनाराचे दुकानातून सोनसाखळी चोरुन पळुन जाणाऱ्यास साथीदारासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

सोनाराच्या दुकानातून सोन्याची चैन घेवून पळून जाणारा गुन्हेगारास त्याचे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घेतले ताब्यात….

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(19) जुलै २०२४ रोजी चे दुपारी 1.30 वाजता चे सुमारास यातील फिर्यादी वैभव सतिशकुमार खंडेलवाल यांचे मौजा लांजी रोड, आमगाव येथील खंडेलवाल ज्वेलर्स दुकानात एक अनोळखी ईसंम हा सोन्याची चैन खरेदी करण्याचे बहाण्याने आला व दुकानातून  एक सोन्याची चैन अंदाजे 15. 12 ग्रॅम वजनाची कि अंदाजे 1 लाख 21 हजार/- रू ची घेवुन पैसे न देता दुकानातुन पळून गेला व  साधारणतहा  200 मी. अंतरावर असलेल्या अनोळखी ईसम व त्याचा साथीदार याचे मोटारसायकल बसून पळून गेल्याचे यातील फिर्यादी वैभव सतिशकुमार खंडेलवाल याचे तक्रारीवरुन वरून पो. ठाणे आमगाव येथे अपराध क्रमांक – 305/ 2024 कलम 305(A), 3(5) भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता

घटनेचे गांभीर्य बघता पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे याचे सूचना व  मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक करीत असताना पथकास घटनास्थळावरून प्राप्त अनोळखी व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज वरून, तसेच गोपनीय बातमीदार, यांचेकडून प्राप्त माहितीच्या आधारे यातील संशयीत ईसंम 1) शुभम मुन्नालाल ठाकरे, वय 20 वर्षे, रा. बटाना, ता. जि. गोंदिया2) अभिषेक योगराज नागपुरे, वय 20 वर्षे, रा. बरबसपुरा, ता.जि. गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले. नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने संशयितांना विश्वासात घेवून सखोल चौकशी  केली असता आरोपी क्र १ शुभम याने चैन घेवून पळून आरोपी क्र. 2 अभिषेक ह्या त्याच्या साथीदारासह पळून गेल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेली चैन किंमती 1 लाख 25 हजार रुपयाची हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आली आहे आरोपींना मुद्देमालासह आमगाव पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया आमगाव पोलिस करीत आहेत..

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे निर्देशान्वये पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक महेश विघ्ने, म.पो.उप.नि वनिता सायकर, पो. हवा विठ्ठलप्रसाद ठाकरे, इंद्रजित बिसेन, पो.शि. हंसराज भांडारकर, चा.पो. शि. घनश्याम कुंभलवार यांनी केलेली आहे.

Comments (0)
Add Comment