वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला अधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात अधिक नियम सांगितले आहे. त्या नियमांचे पालन केल्याने आपल्या शुभ फले प्राप्त होतात. पण काही नियम न पाळल्याने आपल्याला नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रात दिशेशी संबंधित नियमांची काळजी घेतल्यास अनेक चांगले परिणाम मिळतील. जाणून घेऊया घरातील कोणत्या दिशेला कोणत्या गोष्टी ठेवू नये.
झोपण्याची जागा
वास्तुशास्त्रानुसार बेडरुन घराच्या दक्षिण दिशेला नसायला हवी. त्यामुळे झोपण्यास अडथळा निर्माण होतो. दक्षिण दिशेला बेड ठेवल्याने पितृदोष तयार होतो. कधीही झोपताना दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नका. असे करणे अंत्यत अशुभ मानले जाते.
देवघर
घरात अडचणी आल्यानंतर आपण सगळ्यात आधी देवाकडे जातो. परंतु, देवघर चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास घरात अनेक अडचणी येतात. तसेच घरातील मंदिर हे उत्तर-पूर्व दिशेला ठेवा.
या गोष्टी दक्षिण दिशेला ठेवू नका
घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप, मंदिर, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा शूज-चप्पल ठेवू नका. असे केल्याने आपल्या जीवनात नकारात्मक येते. तसेच आर्थिक चणचण जाणवू लागते.
या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की, दक्षिण दिशेला बसून कधीही जेवण करु नका. असे केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच कुटुंबाचे फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नका. यामुळे तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.