WhatsApp new feature : नवीन फीचरमध्ये, व्हॉट्सॲप युजर्स आता त्यांच्या प्रोफाइलसाठी युनिक युजरनेम तयार करू शकतील, ज्यामुळे नंबर शेअर न करता चॅटिंग करणे शक्य होईल. सध्या हे फीचर फक्त व्हॉट्सॲप वेबवर उपलब्ध असेल, मात्र ते अद्याप लाँच झालेले नाही.
नवीन फीचरचे फायदे
फेसबुक, इन्स्टाग्राम ॲप्सप्रमाणे व्हॉट्सॲप आता फंक्शन करेल असे फीचर लाँच करण्याचा विचार कंपनी करत आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमच्या प्रोफाइलसाठी खास युजरनेम निवडू शकाल. हे फीचर आगामी अपडेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. व्हॉट्सॲपचे युजरनेम पूर्णपणे युनिक असतील, त्यामुळे कोणीही युजरनेमच्या मदतीने चॅट शोधू शकेल, मात्र त्या व्यक्तीला तुमचा कोड किंवा फोन नंबर शोधता येणार नाही.
तुमच्या महत्त्वाच्या डिटेल्स सुरक्षित
नवीन फीचरनुसार तुम्ही WhatsApp वर युजरनेम निवडू शकाल, तेव्हा त्याला कोणी दुसऱ्याने घेतलेले नाही याची काळजी घेणे आवश्यक असेल. ज्या व्यक्तींना तुम्ही आधीपासूनच ओळखता, ते पूर्वीप्रमाणे तुमच्याशी कनेक्ट राहू शकतील. हे युजरनेम फक्त त्यांनाच दिसेल ज्यांच्याकडे तुमचा फोन नंबर नाही. यामुळे तुमची पर्सनल माहिती अधिक सुरक्षित राहील आणि तुम्ही हे कंट्रोल करू शकाल की कोण तुम्हाला संपर्क करू शकतो.
लवकरच येणार फीचर
WhatsApp वर युजरनेम फीचरची चर्चा सुरू आहे, पण ते अजूनही डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. याचा अर्थ हा फीचर कधी येईल आणि सर्वांना कधी उपलब्ध होईल, हे अजून स्पष्ट नाही. WhatsApp हा फीचर अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यासाठी काम करत आहे, जेणेकरून ते वापरण्यास सोपे, सुरक्षित आणि कोणत्याही अडचणीशिवाय कार्य करेल. त्यामुळे हा फीचर कधी येईल, हे सांगणे सध्या कठीण आहे.