Ashadh Tuesday Upay : आषाढ मंगळवारी करा हे उपाय; कर्जमुक्तीपासून होईल सुटका, हनुमानाची राहिल सदैव कृपा

Mangalvarche Upay :
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याचे स्वत:चे असे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे.
मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात. जर तुमच्या आयुष्यात सतत समस्या येत असतील तर आषाढी मंगळवारी हे उपाय करुन पाहा.
धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिना हा हिंदू पंचांगानुसार चौथा महिना आहे. या महिन्यात प्रत्येक मंगळवारी हनुमानाची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे तसेच त्यांची पूजा कशी करावी.

मंगळवारचे उपाय

1. मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन राम नामाचा जप करावा. राम नामाचा जप केल्याने हनुमान प्रसन्न होतात. तसेच लोकांच्या जीवनातील संकटे दूर होतात.
2. दर मंगळवारी रामरक्षा स्तोत्राचा पाठ करा. त्यानंतर हनुमानाला गुळ आणि हरभरा अर्पण करा. यामुळे हनुमानाची कृपा प्राप्त होते.
3. मंगळवारी व्रत करुन गरिबांना अन्नदान करावे. असे केल्याने हनुमानाची कृपा राहाते. तसेच धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. तसेच कुंडलीतील मंगळ अधिक बलवान होतो.
4. मंगळवारी सुंदराकांडचे पठण केल्याने हनुमानाचा आशीर्वाद राहातो. वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर मंगळवारी मसूर डाळ दान करावे. तसेच तांबे, लाल चंदन मंगळवारी दान करणे शुभ मानले जाते. ज्यामुळे मंगळ बलवान होतो. तसेच जीवनात आर्थिक समृद्धी राहाते.
5. मंगळवारी २१ पिंपळाची पाने घेऊन गंगाजलाने स्वच्छ करावे. त्यावर चंदन किंवा शेंदूर लावून श्री रामाचे नाव लिहावे. ही पाने हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने कर्जमुक्तीपासून सुटका होते.
6. मंगळवारी कर्जमुक्तीसाठी अंगारक स्तोत्राचे पठण विशेष फलदायी ठरते. हा पाठ केल्याने कर्जापासून मुक्ती करते. मंगळवारी सुंदरकांड पठण करणे शुभ ठरते.
7. आर्थिक समृद्धी मिळवायची असेल तर मंगळवारी गोमती चक्रावर शेंदूर आणि नारळ लावून हनुमानाला अर्पण करा. या उपायाचा अवलंब केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astro newsJob solutionLord HanumanMangalwar che UpayTuesday AstrologyTuesday remediesकर्जमुक्तीसाठी करा हे उपायमंगळवारचे उपायमंगळवारी करा हे 6 खास उपायहनुमानाची पूजाहनुमानाचे टोटके
Comments (0)
Add Comment