महीलेची सोनसाखळी हिसकावनारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड….


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

महीलेची सोनसाखळी लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड….

नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१२)जुलै २०२४ चे  दुपारी २.०० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी सौ. रंजना गणेश सोनसरे, वय ४२ वर्ष रा. वलनी जि. नागपूर ही एकटी आपले  शेतातुन घरी येत असतांना काळया रंगाच्या मोटर सायकलवरून दोन अनोळखी इसमांनी त्यांचे गळयातील सोन्याची पोत हिसकावुन दोन्ही इसम मोटरसायकल ने पळून गेले अशा फिर्यादीचे तक्रारी वरून पोलिस ठाणे कळमेश्वर येथे अप. क्र. ५११/२४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. दि. १९/०७/२०२४ रोजी पो.स्टे.
कळमेश्वर अप. क्र. ५११ / २४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स. गुन्ह्यात समांतर तपास करत असतांना  फिर्यादी हिने सांगितलेले आरोपीचे वर्णनावरून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरून संशईत आरोपी  विशाल उर्फ अशोक जयराम जाधव, वय ३० वर्ष, रा. वडार मोहल्ला गिट्टीखदान यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दि. १२/०७/२०२४ रोजी त्याने त्याचा साथीदार   व्यंकटी उर्फ मामा धोत्रे, रा. वडार मोहल्ला गिट्टी खदान याचे सह मिळून कळमेश्वर व याच महिन्यात पहिल्या आठवड्यात सावनेर येथे महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने मोटरसायकल वरून
हिसकावून पळून गेल्याचे कबूल केले.तसेच त्यांनी १) पो. स्टे. कळमेश्वर अप क्र. ५११ / २४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स.
२) पो.स्टे. सावनेर अप क्र. ६२० / २४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स. हे गुन्हे उघडकिस आणले

सदर आरोपीने दिलेल्या माहितीवरून गुन्ह्यात चोरीचा मुद्देमाल १) सोन्याचे पोत मधील ०२ नग डोरले व १२ नग सोन्याचे मनी अंदाजे वजन ४ ग्रॅम किंमती २०००० /- रु २) सोन्याचे चैन व  लॉकेटसह अंदाजे वजन ८.५ ग्रॅम अंदाजे किंमत ५५००० /- रु. गुन्हयात वापरलेली ३) एक होंडा नलिवो मोटरसायकल दुचाकी क्रमांक एम एच – ३६ / डी.ए – ४२०८ किंमती ५०००० /- रु ४) एक मोबाईल कि. १००००/- असा एकूण १,३५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच  आरोपी क्र. १) विशाल उर्फ अशोक जयराम जाधव, वय ३० वर्ष, रा. वडारमोहल्ला गिट्टीखदानजि. नागपूर यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पो.स्टे. कळमेश्वर यांचे ताब्यात देण्यात आले आहे
उघडकीस आलेले गुन्हे
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक हर्ष ए पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस
निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पोउपनि आशिष मोरखडे, बट्टूलाल पांडे, पोहवा दिनेश अधापुरे, इक्बाल शेख, संजय बांते, विपीन गायधने, प्रमोद भोयर, संजय बरोदीया, रोशन काळे, नितेश पिपरोदे, प्रमोद तभाने, रोहन डाखोरे, मिलींद नांदुरकर, राजू रेवतकर, नाना राउत, विनोद काळे, चालक अमोल कुथे, राकेश तालेवार, शंकर मडावी, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, अमृत किनगे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, कविता बचले, नितु रामटेके तसेच सायबर सेल चे सतिश राठोड यांनी पार पाडली.

Comments (0)
Add Comment