Jio OTT Recharge Plans: जर तुम्ही देखील जिओ युजर असाल, तर तुम्हाला हे माहित असायला हवे कि, कंपनी काही प्लॅन ऑफर करते ज्यांची किंमत खूप कमी आहे आणि त्यामध्ये OTT सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 175 रुपये आहे.
जिओचा 175 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या OTT प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 175 रुपये आहे. या प्लॅनसह, SonyLIV, Zee5, Jio Cinema Premium, Lionsgate Play, Discovery Plus, Sun Next आणि इतर अनेक सबस्क्रिप्शन ग्राहकांना दिले जातात. हा फक्त डेटा पॅक आहे, जो 12 OTT च्या फायद्यांसह येतो. यामध्ये 10 GB डेटा देण्यात आला असून त्याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. हे ‘Jio TV प्रीमियम प्लॅन’ म्हणून ऑफर केले जाते.
जिओचा 329 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या 329 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Jio Saavn Pro चे सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. त्याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे.
जिओचा 889 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे Jio Saavn Pro चे सबस्क्रिप्शन. तसेच प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जातो.
949 रुपयांचा प्लॅन
Jio त्याच्या 949 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देण्यात येत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. याचा अर्थ अंदाजे 3 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे.
जिओचा 1299 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा लाभ दिला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटाचा लाभ दिला जातो. विशेष बाब म्हणजे या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.