महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
आर्वी पोलिसांचे अटकेत असलेल्या आरोपींकडुन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…
सेवाग्राम(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(06)मे 2024 रोजी फिर्यादी अमोल रमेशराव दारोंडे, वय 41 वर्ष, रा. मांडवगड, ता. जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे येवुन तक्रार दिली की, दि. 30/04/2024 रोजी त्यांनी त्यांची जुनी बजाज कंपनीची पल्सर 125 DTSI मोटर सायकल क्र. MH-32-AT-8425 अंदाजे कि. 55,000/- घराचे समोरील अंगणात रात्री हँडल लाँक करुन ठेवली असता रात्रीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. सेवाग्राम येथे अप. 341 / 2024 कलम 379 भा.दं.वि. अन्वये नोंद करुन तपास सुरु असतांना
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान पोलिस स्टेशन आर्वी येथुन माहिती मिळाली की, आरोप 1) नयन मिलींद गायकवाड, वय 19 वर्ष, रा. कोसुर्ला, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, 2) मोहम्मद फैजान मोहम्मद फिरोज, वय 20 वर्ष, रा. कामरगाव, ता. कारंजा, जि. वाशिम, 3) सैय्यद सलमान सैय्यद साबीर, वय 21 वर्ष, रा. मसला, ता. कारंजा, जि. वाशिम यांना आर्वी पोलिसांनी अटक केली असुन नमुद आरोपींनी पो.स्टे. सेवाग्राम हद्दीतुन सुध्दा मोटर सायकल चोरल्याचे
निष्पन्न झाले आहे.
अशा माहितीवरुन नमुद आरोपींना मा. न्यायालयाच्या आदेशाने प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेवुन त्यांना अटक केली तसेच यातील आरोपी क्र. 3 सैय्यद सलमान सैय्यद साबीर, वय 21 वर्ष, रा. मसला, ता. कारंजा, जि. वाशिम याचे घरुन अप. 341 / 2024 कलम 379 भा.दं.वि. गुन्हयातील 1) जुनी बजाज कंपनीची पल्सर 125 DTSI मोटर सायकल क्र. MH-32-AT-8425 जिचा चेचीस क्र.MD2864BX4NWC23684 व इंजीन क्र. DHXWNC55629 कि. 55,000/- जप्त करण्यात आली तसेच ईतर गुन्हयातील 2 ) होन्डा शाईन ( नंबर प्लेट नसलेली) ग्रे रंगाची निळा पट्टा असलेली जिचा चेचीस क्र. ME4JC651HG7411429 व इंजीन क्र. JC65E70614704 कि. 30.000/- 3) हिरो स्प्लेंडर प्लस (नंबर प्लेट नसलेली) काळ्या रंगाची ग्रे पट्टा असलेली जिचा चेचीससक्र. MBLHAW234P5J11948 व इंजीन क्र. HA11E8P5]62050 कि. 35,000 /- व 4) हिरो स्प्लेंडर प्लस (नंबर प्लेट नसलेली) काळ्या रंगाची पांढरा पट्टा असलेली जिचा चेचीस क्र MBLHAW08XLHA2496 व इंजीन क्र. HA10AGLHA33287 कि. 45,000/- असा असुन एकुण कि रु. 1,65,000 /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नुरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनित घागे यांचेसह पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील पोलिस अंमलदार हरीदास काकड, गजानन कठाणे, अभय इंगळे, सचिन सोनटक्के, मंगेश झांबरे, संजय लाडे, मंगेश तराळे यांनी केली