Google Maps: जर तुम्ही एखाद्या मार्गाचा शोध घेण्यासाठी गूगल मॅप्सचा वापर करत असाल आणि मॅप्समध्ये रस्ते शोधून तुम्ही हैराण झाले असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गूगल मॅप्स वॉकिंग मोड फीचरच्या मदतीने तुमची ही अडचण दूर होऊ शकते. कशी ते जाणून घेऊया
गूगल मॅप्स वॉकिंग मोड
गूगल मॅप्स वॉकिंग मोड फीचरच्या मदतीने आता तुम्ही सहजपणे तुमच्या लोकेशनवर पोहोचू शकता. जर गूगल मॅप्समध्ये एखादा मार्ग समजत नसेल, तर फोनला सेल्फी घेताना जसा धरता तसा धरावा. असे केल्यावर फोनचा कॅमेरा लोड होईल आणि नंतर रस्त्यांवर बाणांची चिन्हे दिसू लागतील. हे बाण तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे हे दाखवतील. मात्र, यासाठी तुम्हाला काही सेटिंग्ज कराव्या लागतील. चला, पाहूया प्रक्रिया काय आहे.
प्रोसेस फॉलो करा
- सर्वप्रथम, तुमच्या डिव्हाइसवर गूगल मॅप्स अॅप उघडा.
- त्यानंतर, तुम्हाला जिथे जायचे आहे, त्या ठिकाणाचे लोकेशन रजिस्टर करा.
- तुम्ही ज्या ठिकाणी उपस्थित आहात, त्या ठिकाणाचे लाईव्ह लोकेशन दाखवा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार मोडची निवड करावी लागेल. यात दुचाकी, चारचाकी, बस आणि वॉकींग असे पर्याय मिळतात.
- त्यानंतर वॉकिंग मोड निवडा. असे केल्यावर फोनला सरळ धरावा, जसे सेल्फी घेताना धरता तसे.
- असे केल्यावर फोनचा कॅमेरा लोड होईल.
- फोनचा कॅमेरा लोड झाल्यावर लाईव्ह मोड चालू होईल. त्यानंतर बाणांच्या निशाणांसह रस्ता दाखवेल की तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे.
याची काळजी घ्या
गूगल मॅप्स वॉकिंग मोडच्या मदतीने तुम्ही योग्य प्रकारे रस्ता शोधू शकाल. या फीचरमुळे तुम्हाला मॅप्सवर लक्ष ठेवावे लागणार नाही. कारण यामुळे तुम्हाला वेळोवेळी कोणत्या दिशेला जायचे आहे ते कळेल. तसेच, तुम्ही बाईक किंवा फोर व्हीलरने प्रवास करत असाल तर तुम्हाला तसे ऑप्शन निवडावे लागेल.