Budget 2024: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2024 सादर करताना स्मार्टफोन ग्राहकांना आणि मॅन्युफॅक्चरर्सना मोठी भेट दिली आहे. सरकारनं मोबाइल फोन्स आणि चार्जर्ससाठी बेसिक कस्टम ड्यूटी मध्ये कपात केली आहे, ज्यामुळे हे प्रोडक्ट स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या कंपन्या मोबाइलची निर्मिती भारतात करत आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय दिलासादायक आहे.
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की, “मोबाइल फोन, मोबाइल PCBs आणि मोबाइल चार्जर्सवरील बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) कमी करून 15 टक्के केली जाईल.” विशेष म्हणजे याआधी जानेवारीत सरकारनं स्मार्टफोन्स कंपोनंट्सवरील इंपोर्ट ड्यूटी कमी करून 10 टक्के केली होती. आता BCD मध्ये 5 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करून सरकारनं फक्त देशात स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन दिले नाही तर ग्राहकांना देखील दिलासा दिला आहे.
ड्यूटी टेक ब्रँड्स किंवा मॅन्युफॅक्चरर्स डिवाइस किंवा कंपोनंटस दुसऱ्या देशातून मागवताना BCD म्हणजेच बेसिक कस्टम द्यावी लागते. या कस्टम ड्यूटीमध्ये कपात केल्यामुळे मॅन्युफॅक्चरर्सचा खर्च कमी होईल आणि याचा परिणाम डिवाइस, स्मार्टफोन्स, मोबाइल चार्जर्स आणि कंपोनेंट्सच्या किंमतींवर दिसू लागेल.
सरकारनं बजेट 2024 मध्ये केलेल्या या बदलांमुळे सरकार ग्लोबल टेक ब्रँड्स आणि मॅन्युफॅक्चरर्ससाठी भारत एक मार्केट म्हणून नव्हे तर मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओपन करू पाहत आहे. गुगल, अॅप्पल आणि शाओमी सारखे अनेक ब्रँड्स आपले डिवाइस भारतात मॅन्युफॅक्चर करत आहेत आणि कस्टम ड्यूटीमध्ये कपात केली गेल्यामुळे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट देखील कमी होईल.
सरकारनं त्या कंपोनेंट्स आणि मिनरल्ससाठी देखील BCD कमी केली आहे, ज्याचा वापर लिथियम-आयन बॅटरीज बनवण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे रीचार्जेबल डिवाइसमध्ये Li-on बॅटरीचा वापर केला जातो. तसेच मोबाइल फोन PCBs (फोनमधील इन्सुलेटिंग मॅटीरियल बोर्ड्स) देखील आधीच्या तुलनेत स्वस्त होतील, ज्यामुळे फोन आणि इतर डिवाइसेज रिपेअर करण्याचा खर्च आधीपेक्षा कमी होऊ शकतो.