महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
शेतातील पाण्याचे मोटारपंप चोरी करणारी टोळी सेलु पोलिसांचे ताब्यात….
सेलु(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (०५)फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन, सेलु हद्दीतील मौजा खापरी व जुनगड येथील शेतकरी अनुक्रमे सुधाकर वासकर, मोरेश्वर वासकर, वसंतराव वासकर सर्व रा. खापरी तसेच जितेंद्र उरकुडे रा. जुनगड यांनी त्यांचे शेतात पिकांना पाणी ओलीता करीता लावलेल्या ५ सबमर्सिबल व १ विहीरीतील मोटर पंप काही अज्ञात चोरटयांनी चोरून नेले होते त्या संबंधाने पोलिस स्टेशन सेलू येथे
अज्ञात चोरट्यांविरूध्द अपराध क्रमांक २७८ / २०२४ कलम ३७९ भादवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपासात पोलिस स्टेशन, सेलु येथील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी गोपनिय माहीतीच्या व तांत्रीक पुराव्यांच्या आधारे गुन्हा उघडकीस आणुन आरोपी १) शिवाशिष अशोक सराटे, वय २३ वर्ष, २) सुरज सुरेशराव मुंडेकार वय २१ वर्ष, दोन्ही रा. जवाई नगर वरुड जि. वर्धा, ३) अभिजीत संजय भेदरकर, वय २२ वर्ष, ४) यश गजानन इंगोले, वय १९ वर्ष दोन्ही रा. सोमनाथे ले आऊट सिंदी मेघे वर्धा यांना निष्पन्न करुन ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेल्या ५ सबमर्सिबल व १ विहीरीतील मोटर पंप जप्त केले आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक. नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. साग रतनकुमारर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सपोनि मंगेश भोयर ठाणेदार पोलिस स्टेशन सेलु, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार गणेश राऊत, पोशि ज्ञानदेव वनवे पो.स्टे सेलू यांनी केली.