घरफोडीच्या गुन्ह्यातील रेक्रॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन स्थाक गुन्हे शाखेने उघड केले १७ गंभीर गुन्हे…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना, 206 ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 15 लाख 23 हजार रुपयाच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, दरोडा, जबरीचोरी, घरफोडीचे 17 गुन्हे केले उघड…..

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. तसेच दरोडा व जबरी चोरीचे ही गुन्हे घडले होते. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला घरफोडी, दरोडा, जबरीचोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना जिल्हाभर ठिकठिकाणी बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.घरफोडीतील गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी अहमदपूर ते टेंबुर्णी जाणारे रोडवर एका ब्रिजच्या खाली त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने विकण्या साठी येणार आहेत. अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ अहमदपूर येथे रवाना करण्यात आले सदर पथकाने अहमदपूर तालुक्यात पोहोचून अहमदपूर ते टेंबुर्णी जाणाऱ्या परिसरात सापळा लावून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून दरोडा, जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 22/07/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) भारत गोविंद शिंदे उर्फ अशोक समिंदर शिंदे, वय 45 वर्ष, राहणार बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी, सध्या राहणार मळाई पार्क, फुरसुंगी, हडपसर जिल्हा पुणे.2) अविनाश किशन भोसले, वय 23 वर्ष, नायगाववाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड  असे असल्याचे सांगितले.सत्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्या-चांदीचे वेगवेगळे दागिने दिसून आले त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी, दरोडा, जबरीचोरी चे गुन्हे केल्याचे व त्या गुन्ह्या मध्ये चोरलेला, त्याच्या हिश्याला आलेले सोन्या-चांदीच्या दागिन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असल्याचे कबूल केले. लातूर जिल्ह्यात घडलेल्या घोरफोडीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद आरोपीनी पोलिस ठाणे अहमदपूर येथील चार गुन्हे , पोलीस ठाणे वाढवना येथील चार गुन्हे ,चाकूर पोलिस ठाण्यातील पाच गुन्हे,पोलिस ठाणे किनगाव, उदगीर ग्रामीण, लातूर ग्रामीण व रेणापूर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण 17 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या 206 ग्राम सोन्याचे दागिने, 99 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 35,000/- हजार रुपये रोख असा 15 लाख 23 हजार 192 रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे वाढवना यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या फरार आरोपी साथीदाराचा शोध सुरू आहे.वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी तसेच दरोडा व जबरीचोरी सारखे गंभीर गुन्हे करून करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरचे गुन्हेगार हे सराईत असून ते लातूर सह इतर शेजारील जिल्ह्यांना सुद्धा त्यांच्याकडील गुन्ह्यात पाहिजे आहेत. इतर जिल्ह्याचे पोलिस त्यांच्या मागावर होते परंतु नमूद गुन्हेगार त्यांचे राहण्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिशय कुशलतेने व माहितीचे संकलन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींना ताब्यात घेतले आहे. नमूद आरोपी कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही  पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकामधील सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलिस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, प्रदीप स्वामी, जमीर शेख, संतोष खांडेकर नकुल पाटील, अंगुली मुद्रा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलिस अमलदार धनंजय गुट्टे, फोटोग्राफर सुहास जाधव, सायबर सेलचे पोलीस अमलदार संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली आहे.

Comments (0)
Add Comment