महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
जियो बेस सेटर येथील वातानुकुलीत यंत्रामधील तांब्याची तार चोरणारे मुद्देमालासह गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेतले ताब्यात….
गोंदिया(प्रतिनिधी) . याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) एप्रिल २०२४ रोजी यातील फिर्यादी सतिश शामलाल कावळे, रा. खमारी ता. जि. गोंदिया, हे रिलायन्स जियो बेस सेंटर गोंदिया येथे टेक्नीशियन म्हणुन काम करतात,दि२३/०४/२०२४ रोजी यांनी जियो बेस सेंटर मधील ए. सी. मशीन बंद पडल्याने त्यांनी ए. सी. मशीन चे आऊटडोर युनीट ची पाहणी केली असता युनीट मध्ये लागलेले ०१) ०१ इंचीचे ३० मीटर ताब्यांचे पाईप ०१ नग, व ०२) १.५ इंचीचे ३० मीटर ताब्यांचे पाईप ०१ नग असा एकुण ६० मीटर ताब्यांचे पाईप असा एकुण कि ७०,०००/-रु. चा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन गोंदिया शहर येथे अप क्र. २६३/२०२४ कलम ३७९ भादंवी. अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली होता
पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, पोलिस स्टेशन गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदार यांनी गोपनिय माहितीच्या आधारे यातील संशईत आरोपीचा शोध घेऊन यातील संशईत आरोपी योगेश गोविंदराव उगेमुगे, वय- ३२ वर्षे, रा. बजाज वार्ड, मरघट रोड, गोंदिया याला ताब्यात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी करुन चोरीस गेलेले मुद्देमाला पैकी
०१) पेचकलेले तांब्याचे पाईपचे तुकडे अंदाजे २५ मीटर कि. २७,०००/- रु., व ०२) ताब्यांवे तार वजन अंदाजे ०५ किलो, कि. ५,०००/- रु. असा एकुण किंमत- ३२,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक, नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी,गोंदिया रोहीणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर चे पोलिस निरिक्षक किशोर पर्वते, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते यांनी केली.