देशी कटटा बाळगणा-यास ताब्यात घेवून देशी कटटा (गावठी बनावटीची पिस्टल) केली हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कमगिरी….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (21) जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, मौजे वडगाव ता.पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीचा देशी कटटा असून तो मांगीलालदादा नगर विटावा वार्ड पुसद येथे आलेला आहे
अशा गोपनिय माहितीवरुन पथकाने तात्काळ मांगीलालदादा नगर विटावा वार्ड पुसद येथे रवाना होवून माहिती प्रमाणे इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव विनोद चव्हाण वय 20 वर्षे रा.वडगाव ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितले वरुन त्यास गावटी बनावटीचे देशी कटटा बाबत विचारपुस केली असता त्याने गावठी बनावटीचा देशी कटटा त्याचा मित्र शैलेश प्रल्हाद चव्हाण रा.वडगांव यांच्याकडे दिला असल्याचे सांगितल्याने वडगांव ता.पुसद येथे जावून शैलेश प्रल्हाद चव्हाण वय 24 वर्षे, रा. वडगाव ता. पुसद यास ताब्यात घेवून त्यास गावटी बनावटीचा देशी कटटा बाबत विचारपुस केली असता सदर गावटी बनावटीचा देशी कटटा घरात ठेवला असल्याचे सांगून त्याने त्याचे राहते घरातून पंचा समक्ष एक गावटी बनावटीचा देशी कटटा काढून दिल्याने तो जप्त करुन ताब्यात घेतला.
त्यानंतर सदरचा देशी कटटा कोणाचा आहे व कोणाकडून घेतला याबाबत गौरव विनोद चव्हाण यास विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, सदरचा देशी कटटा हा त्याने त्याचा मित्र अतिष ऊर्फे कावा विनोद राठोड रा. वडगाव याने त्यास दिला असून देशी कटयाचे दोन राऊड ( काडस्तुस ) त्याचेकडे आहे असे सांगितल्याने त्याचे बाबत गावात माहीती काढली असता तो कामानिमित्त पुणे येथे गेला असल्याचे समजले. तरी गावटी बनावटीचा देशी कटटा बाळगणारे 1) गौरव विनोद चव्हाण वय 20 वर्षे रा. वडगाव ता. पुसद जि. यवतमाळ 2)शैलेश प्रल्हाद चव्हाण वय 24 वर्षे, रा. वडगाव ता. पुसद जि. यवतमाळ यांचे कडून दोन मोबाईल व एक गावठी बनावटीचा देशी कटटा असा एकूण 60,000 रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेतला असून नमुद दोन्ही आरोपी व पाहीजे असलेला आरोपी 3)आतिष ऊर्फे कावा विनोद राठोड वय 18 वर्षे, रा. वडगांव ता. पुसद जि. यवतमाळ यांचे विरुध्द पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 35 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर,पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, चापोउपनि रेवण जागृत,पोहवा तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार,रमेश राठोड, पोशि मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
The post गुन्हे शाखेने देशी कट्ट्यासह एकास घेतले ताब्यात,आणखी दोघे रडारवर… appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.