Poco F6 Deadpool Special Edition: पोको एफ6 5जी यावर्षी मे मध्ये भारतात लाँच झाला आहे. आता या स्मार्टफोनचा एक लिमीटेड एडिशन कंपनी लाँच करणार आहे. ज्यासाठी कंपनी डेडपूल सोबत भागेदारी करू शकते. असा एक हँडसेट लीक झाला आहे. ज्यात डेडपूल सिग्नेचर क्रिमसन रेड कलर देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपच्या डावीकडे POCO Special Limited Edition लिहिण्यात आलं आहे.
टिपस्टर योगेशनं स्मार्टप्रिक्स सोबत मिळून X वर एक फोटो शेयर केला आहे, ज्यात एक अनोळखी Poco स्मार्टफोन दिसत आहे. यात फोनच्या बॅक पॅनलचा वरचा भाग दिसत आहे. ज्यात दोन कॅमेरा रिंग आणि एक फ्लॅश रिंगसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिसतो. फोटोमध्ये लाल रंगाचा लेदर फिनिश पॅनल आणि कॅमेरा सेटअपच्या डावीकडे POCO Special Limited Edition लिहलेलं दिसत आहे. जो डेडपूलच्या सिग्नेचर क्रिमसन रेड रंगासारखा दिसत आहे.
फ्लॅश यूनिट मध्ये डेडपूलचा लोगो बनलेला दिसत आहे. तसेच, पॅनलच्या खालच्या भागात डेडपूलचा फोटो असण्याची शक्यात आहे, जो दोन तालवारींसह सिग्नेचर पोज मध्ये उभा आहे.
हा एक खास लिमीटेड एडिशन स्मार्टफोन असू शकतो, त्यामुळे या POCO डिवाइस सोबत अनुरूप बॉक्स आणि स्टिकर, कीचेन आणि इतर अनेक गिफ्ट मिळू शकतात. स्मार्टफोन कस्टमाइज्ड युआयसह देखील येऊ शकतो. जो ऑगस्टच्या सुरुवातीला विक्री सुरु होण्यापूर्वी 26 जुलैला रिलीज केला जाऊ शकतो.
या Poco स्मार्टफोनचा हा कॅमेरा सेटअप Poco F6 सारखा दिसत आहे. जो यावर्षी मे मध्ये भारतात उपलब्ध झाला होता. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED पॅनल मिळतो. फोन Snapdragon 8s Gen 3 चिपसेटवर चालतो. यात 5000mAh ची बॅटरी मिळते, जी 90Hz चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा आणि 8-मेगापिक्सलच्या सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.
जर ही बातमी खरी ठरली तर Poco F6 चा Deadpool Special Limited Edition लाँच होऊ शकतो. ज्याचे स्पेसिफिकेशन्स जास्त बदलणार नाहीत.