Shukra Gochar 2024 In Marathi : लक्ष्मी नारायण राजयोग! शुक्राचा सिंह राशीत प्रवेश, मेषसह ४ राशींना धनलाभ, व्यवसाय-नोकरीत प्रमोशन

Venus Transit 2024 In Leo Zodiac : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतोय. ३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सिंह राशीत बुध आणि शुक्राचा शुभ संयोग तयार होत आहे. लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यानंतर काही राशींना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच शुक्र हा सुख-सुविधा, प्रेम आणि विलासतेचा कारक मानला जातो तर बुध ग्रह हा बुद्धी आणि विवेकशील कार्यात निपुण असतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Shukra Gochar 2024 In Marathi : लक्ष्मी नारायण राजयोग! शुक्राचा सिंह राशीत प्रवेश, मेषसह ४ राशींना धनलाभ, व्यवसाय-नोकरीत प्रमोशन
Shukra Gochar 2024 In Singh Rashi :
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतोय. ३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सिंह राशीत बुध आणि शुक्राचा शुभ संयोग तयार होत आहे.
लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यानंतर काही राशींना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच शुक्र हा सुख-सुविधा, प्रेम आणि विलासतेचा कारक मानला जातो तर बुध ग्रह हा बुद्धी आणि विवेकशील कार्यात निपुण असतो. ऑगस्ट महिन्यात तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोगामुळे ४ राशींना आर्थिक लाभ, कौटुंबिक आनंद आणि करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. जाणून घेऊया कोणत्या राशींना ऑगस्ट महिन्यात फायदा होईल.

मेष – बौद्धिक क्षमतेत वाढ

मेष राशीच्या कुंडलीतील पाचव्या घरात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. या काळात तुम्हाला मुलांकडून काही चांगल्या आणि आनंदाची बातमी मिळेल. या काळात तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. बौद्धिक क्षमतेमुळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगले यश मिळवतील. काम करणाऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या नवीन संधी देखील मिळतील.

कर्क – आर्थिक लाभ होण्याची शक्यता

कर्क राशीत दुसऱ्या स्थानात लक्ष्मी नारायणाचा राजयोग तयार होत आहे. या राजयोगामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबाकडून आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहिल. लाभाच्या अनेक नवीन संधी मिळतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे कामात अनेकांचे मन जिंकाल. वाहन, घर खरेदी करु शकता.

सिंह – इच्छूकांचे लग्न जमेल

सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. शुक्र- बुध एकत्र आल्याने हा काळ या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. व्यावसायिकांना कामात मोठे यश मिळू शकते. विवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि भावना एकमेकांबद्दल वाढतील. कमाईच्या नवीन संधी मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची तब्येतही चांगली राहिल. या काळात इच्छूकांचे लग्न जमेल.

तुळ – रखडलेल्या कामाना गती मिळेल.

तुळ राशीच्या अकराव्या स्थानात लक्ष्मी नारायणाचा राजयोग तयार होत आहे. हा राजयोग उत्पन्नाच्या घरात होणार असल्यामुळे कमाईच्या नवीन संधी मिळतील. तुमच्याकडे उत्पन्नाचे एकापेक्षा अनेक स्त्रोत तयार होतील. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. मोठ्या भावंडांकडून लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा वाढेल.

धनु – नशीबाची साथ मिळेल.

धनु राशीच्या नवव्या घरात लक्ष्मी नारायणाचा राजयोग तयार होत आहे. हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. समाजात उच्च स्थान मिळेल. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास केल्याने व्यवसायात फायदा होऊ शकतो. स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांना यश मिळेल.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Shukra Gochar 2024Shukra Gochar 2024 In MarathiShukra Gochar 2024 In Singh Horoscopevenus transit 2024 in Leo zodiacVenus Transit 2024 In Singh Rashiलक्ष्मी नारायण राजयोगशुक्र संक्रमणाचा कसा होईल प्रभावशुक्र संक्रमणाचे ५ राशींना फायदासिंह राशीत शुक्राचे संक्रमण २०२४
Comments (0)
Add Comment