Jio Bharat J1 4G Launched: रिलायन्स जियोनं गुपचूप नवीन 4G फिचर फोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Jio Bharat J1 आहे. हा एक 4G कीपॅड फोन आहे जो नवीन डिजाइन आणि फीचर्ससह आला आहे.

जिओ भारत जे1 4जीची किंमत
जिओ भारत J1 4G गेल्यावर्षीच्या जिओ भारत व्ही2, व्ही2 कार्बन आणि भारत बी1 पेक्षा महाग आहे. त्या फोन्सची किंमत फक्त 999 रुपये होती. तर भारत J1 4G ची किंमत 1,799 रुपये आहे. हा डिव्हाइस अॅमेझॉनवर सिंगल ब्लॅक/ग्रे कलर ऑप्शन ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
जिओ भारत जे1 4जीचे स्पेसिफिकेशन
जिओ भारत जे1 4जी एक नवीन डिजाइनसह येतो. डिव्हाइसमध्ये थोडा मोठा फॉर्म फॅक्टर आणि मोठी स्क्रीन आहे. यात 2.8-इंचाचा डिस्प्ले आहे. या मोठ्या आकारामुळे यात 2,500mAh ची मोठी बॅटरी मिळते. मोठी बॅटरी आणि स्क्रीनमुळे 4जी फीचर फोन कमी बजेट असलेलया लोकांसाठी एक चांगला एंटरटेनमेंट डिवाइस ठरू शकतो. कारण यात लोक आरामात जिओ टीव्हीच्या मदतीनं टीव्ही पाहू शकतील.
Jio Bharat J1 फोनमध्ये Jio अॅप्स आणि सेवा मिळतात. यात UPI व्यवहारांसाठी JioPay, कंटेंट स्ट्रीमिंगसाठी JioCinema आणि अन्य फीचर्स मिळतात. तसेच, नवीन जिओ फोनमध्ये JioCinema प्री-इंस्टॉल्ड आहे. युजर्स Jio TV अॅपचा देखील वापर करू शकतात. हे दोन्ही अॅप युजर्सना फोनवर लाइव्ह स्पोर्ट्स आणि लाइव्ह टीव्ही कंटेंट पाहू देतात.
जिओ फोनचा रिचार्ज
जिओ भारत जे1 4जी फोनसाठी 123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनने रिचार्ज केल्यास अनलिमिटेड कॉल, दरमहा 14GB 4G डेटा, Jio अॅप्स आणि सेवा मिळतात. डिव्हाइसमध्ये 3 4G बँड आहेत आणि हा एक लॉक डिवाइस आहे, म्हणजे यात फक्त Jio सिम वापरता येईल.