चंद्रपुर गुन्हे शाखेची जुगारावर चौफेर कार्यवाही,१२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यात जुगांरावर धडक कार्यवाही,७ जुगारींसह १२ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवेद्य धंदयावर रेड करणेबाबत पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखचे  पोलिस
निरीक्षक  महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली  पथकांना आदेशीत केले होते. पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना चंद्रपूर जिल्हयात सुरू असलेल्या अवेद्य धंदयावर छापे टाकून ते  समूळ नष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

त्याप्रमाणे दिनांक 22/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथील
अधिकारी व कर्मचारी यांनी पो. स्टे. राजूरा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की, मौजा चुनाळा येथील झुडपी जंगलात पडित रेल्वे क्कार्टर जवळ एमरजन्सी लाईटच्या उजेडात काही इसम सार्वजनिक ठिकाणी तास पत्यावर पैश्याची बाजी लावून हारजितचा जुगार खेळ खेळीत आहे. अशा मिळाले माहितीवरुन मिळाल्या वरून सदर ठिकाणी जावून छापा टाकून रेड केला असता 3 इसम जागीच मिळून आले व इतर 8 इसम हे रात्रौ
अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. मिळूण आलेल्या इसमाकडून जुगाराचे नगदी रूपये 2,33,800 /- रू.,जुगाराचे साहित्य मोबाईल तास पत्ते, 7 मोटार सायकली असा एकूण 6,80,200 /- रू. चा माल पंचनामा कार्यवाही करूण जप्त करूण जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. स्टे. राजुरा हे करीत आहे.

तसेच याआधी सुध्दा दि. 21/07/2024 ला पो. स्टे. दुर्गापूर हद्दीत मौजा किटाळी शेत शिवारात अवैद्य तास पत्ता जुगारावर मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु,
सुधाकर यादव उपविभागिय पोलिस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक लता वाढिवे,पो. स्टे. दुर्गापूर, पो. स्टॉप दुर्गापूर यांनी किटाळी येथील अवैद्य तास पत्ता जुगारावर छापा टाकून रेड केला असता 4 इसम मिळून आले. त्यांचे कडून जुगाराचे नगदी रूपये व जुगाराचे साहित्य, मोटार सायकली असा एकूण 4,46,060/- रू. चा माल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी विरूध्द जुगार कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर कर्यवाही पोलिस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु स्थानिक गुन्हे शाखा  येथील पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनी मनोज गदादे, विकास गायकवाड, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नापोशि गणेश मोहुर्ले, पोशि. मिनींद जांभूळे यांनी केली आहे

यापुढे कोणीही अवैद्य जुगार, अवेद्य व्यवसाय करीत असल्यास त्याची माहिती पोलीसांना देण्यात यावी असे आवाहन पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी केले आहे

 

Comments (0)
Add Comment