Pune-कोंढवा परिसरात रिक्षा चोरणा-या तपास पथकाडून अटक

तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख

न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क साधा

70306 46046

Pune Kondhwa दि. २०/०७/२०२४ रोजी सायंकाळी १६:०० वा पासून पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे सोबत पोहवा, सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले व अनिल बनकर असे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी १६:३० वा चे सुमारास येवलेवाडी, कामठे पाटीलनगर येथे आले असता एक इसम सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली बजाज कंपनीची काळ्या व पिवळ्या रंगाची तीचा आर.टी.ओ. नंबर एम.एच.१४ जे.पी. ६४२८ ही चालवित असताना दिसून आल्याने सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव संदिप बबन गोसावी, वय ३५ वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळे समोर, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे मुळ रा. रूमनंबर ५६, श्री कृपा सोसायटी, गुरूदत्त मंडळ, पार्क साईड, विक्रोळी पश्चिम, मुंबई असे असल्याचे सांगितले त्यास त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केल्या नेत्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचे ताब्यातून २५,०००/- रू किं ची एक काळ्या व पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षानंबर एम.एच.१२ जे.एस.४५८४ ही जप्त करण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी याने कोंढवा पोस्टे गु.र.नं. ८१७/२०२४ भा.न्या.सं. अधि. २०२३ चेकलम. ३०३ (२) व कोंढवा पोस्टेगु.र.नं. ३२६/२०२४ भादंविकलम ३७९ हे गुन्हे केल्याचेही तपास दरम्यान निष्पन्न झाले आहे.

वरील नमुद कारवाई ही श्री आर. राजा, मा. पोलीस उप-आयुक्त साो., परिमंडळ-५, धन्यकुमार गोडसे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व श्रीमती रूणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे सोबत सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले व अनिल बनकर यांच्या पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment