मुंबई, ठाणे, विरारसह नवी मुंबईत मुसळधार; लोकल वाहतूक उशिराने, दिवसभर जोर’धार’

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसाने गुरुवार सकाळी चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु आहे, तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. वसई विरारमध्येही पावसाने हजेरी लावली असून नवी मुंबईतही तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवरही झाला आहे. सकाळी साडेसात वाजेपर्यंतचा विचार करता, मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या ५ ते १० मिनिटं विलंबाने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहे.
Kolhapur Rain Update: कोल्हापूरला पुराचा धोका? पंचगंगा धोक्याच्या पातळीच्या दिशेने, जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांचे स्थलांतर सुरु

कालच्या दिवसात कुठे किती पाऊस?

याआधी, उत्तर मुंबईत दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, चिंचोली या पट्ट्यामध्ये तसेच ठाण्यात अनेक ठिकाणी सकाळी ६ ते सायं. ६ या कालावधीत ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. तर डोंबिवली पश्चिम, कल्याण येथे दोन ते तीन केंद्रांवर या कालावधीत ७० मिलीमीटरहून अधिक म्हणजे मुसळधार पाऊस नोंदला गेला. कल्याण-डोंबिवलीतील काही केंद्रांवर ४० ते ७० मिलीमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. मुंबई तसेच महामुंबईच्या उर्वरित भागात, नवी मुंबईमध्ये दिवभरात १० ते २० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रावर ६.९, तर कुलाबा येथे २.५ मिलीमीटर पाऊस सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत झाला. उत्तर मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यानंतर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट केला. ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला. पालघर जिल्ह्यामध्ये रेड अॅलर्ट देण्यात आला असून, डहाणू केंद्रावर सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत ५९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Pune rains: पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शाळांना सुट्टी, पुढील काही तासात मुसळधार
मान्सून सध्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रावर सक्रिय आहे. विरुद्ध दिशेने येणारे वारे, किनारपट्टीजवळील ढगांची द्रोणीय स्थिती, चक्रीय वातस्थिती यामुळे मुंबईत सातत्यपूर्ण पाऊस आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील वार्षिक पावसाची कुलाबा केंद्रावर ७२ टक्के, तर सांताक्रूझ केंद्रावर ७१ टक्के आकडेवारी गाठली आहे.

कुलाब्याने ओलांडली ऑगस्टपर्यंतची सरासरी

मुंबईत जुलैमध्ये कुलाबा येथे १,२४६ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे १,४९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जुलै महिन्यातच कुलाबा केंद्रावरील पावसाने ऑगस्टपर्यंतची सरासरीही ओलांडली आहे. सर्वसाधारणपणे ऑगस्टपर्यंत कुलाबा केंद्रावर १,७१६.८, तर सांताक्रूझ केंद्रावर १,८७८.७ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा १ जूनपासून कुलाबा केंद्रावर १,७५३.३ आणि सांताक्रूझ १,८४२.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे.

Source link

Mumbai Heavy Rain AlertMumbai Rain Yellow AlertMumbai rainsThane Rain Updateनवी मुंबई पाऊसमुंबई पाऊस अपडेटमुंबई पाऊस ट्राफिक अपडेटमुंबई मुसळधार पाऊसमुंबई लोकल वाहतूक अपडेट
Comments (0)
Add Comment