लोकसभेच्या ७९ जागांवर गोलमाल, वाढीव मतदान NDAच्या पथ्यावर; ‘त्या’ अहवालातून हेराफेरीचा दावा

मुंबई: लोकसभा निवडणूक सुरु असताना मतदानात होत असलेल्या अचानक वाढीचा मुद्दा चर्चेत राहिला. प्रत्येक टप्प्यातलं मतदान झाल्यावर त्या दिवशी संध्याकाळी मतदानाची टक्केवारी प्रसिद्ध केली जायची. त्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आयोग आकडेवारी जाहीर करायचा. या दोन्ही आकड्यांमध्ये बरीच तफावत दिसायची. याबद्दल व्होट फॉर डेमोक्रसीनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मतदान संपल्यानंतर जाहीर झालेली मतांची टक्केवारी आणि निवडणूक आयोगाकडून काही दिवसांनंतर जाहीर केली जाणारी आकडेवारी यात ४.६५ कोटी मतांचा फरक आहे. मतांचा हा आकडा भाजपप्रणित एनडीएच्या पथ्थ्यावर पडला. यामुळे १५ राज्यांमध्ये एनडीएला ७९ जागांवर फायदा झाला. महाराष्ट्रात ‘वाढलेल्या मतदाना’मुळे एनडीएच्या पारड्यात ११ जागा पडल्या. या सगळ्या जागांवर हेराफेरी झाल्याचा आरोप व्होट फॉर डेमोक्रसीनं केला आहे. फ्री प्रेस जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
Ajit Pawar: अजित पवारांच्या पोस्टरवरुन ‘मुख्यमंत्री’ गायब, चर्चांना उधाण; दादांच्या गोटात चाललंय काय?
‘कंडक्ट ऑफ लोकसभा इलेक्शन्स २०२४’ या नावानं एक अहवाल व्होट फॉर डेमोक्रसीनं प्रसिद्ध केला आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावेळी आणि मतमोजणीवेळी झालेल्या हेराफेरीचं विश्लेषण अहवालातून करण्यात आलं आहे. एकूण झालेलं मतदान आणि मतमोजणीवेळी पुढे आलेला आकडा या दोन्हीमध्ये मोठी तफावत असल्याचा मुद्दा अहवालात आहे.

देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं. प्रत्येक वेळी मतदान संपल्यानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर व्हायची. पण त्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध होणारा मतांचा आकडा अधिक असायचा. ही तफावत ४ कोटी ६५ लाख ४६ हजार ८८५ मतांच्या घरात जाते. त्यामुळे मतदारसंघांमधील मतदान ३.२ टक्के ते ६.३२ टक्के इतकं वाढलं. आंध्र प्रदेशात तर हा आकडा १२.५४ टक्क्यांपर्यंत जातो. या वाढीव मतदानाचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाल्याची बाब अहवालात नमूद करण्यात आलेली आहे.
Maharashtra BJP: यंदा ‘मी पुन्हा येईन’ नाही! भाजपची स्ट्रॅटर्जी ठरली; शिंदेंच्या CM पदाबद्दलही निर्णय झाला
मतदानात झालेल्या वाढीमुळे भाजपप्रणित एनडीएला ७९ जागांवर फायदा झाला. सर्वाधिक फायदा ओडिशात झाला. तिथे एनडीएला १८ जागांवर लाभ झाला. महाराष्ट्रात ११, पश्चिम बंगालमध्ये १०, आंध्र प्रदेशात ७, कर्नाटकात ६, छत्तीसगड आणि राजस्थानात प्रत्येकी ५, बिहार, हरयाणा, मध्य प्रदेश आणि तेलंगणात प्रत्येकी ३, तर आसाममध्ये २, तर अरुणाचल प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका जागेवर एनडीएला मतांमधील हेराफेरीचा फायदा झाला.

लोकसभेच्या ७९ मतदारसंघांमध्ये जिंकणाऱ्या उमेदवारांचं मताधिक्क्य अतिशय कमी राहिलं आहे. वाढलेल्या मतदानापेक्षा त्यांचं मताधिक्क्य कमी आहे, याकडे आयआयएम अहमदाबादचे निवृत्त प्राध्यापक सॅबिस्टियन मॉरिस यांनी लक्ष वेधलं. भारतातील निवडणुकांवर लक्ष ठेवणाऱ्या स्वतंत्र पॅनलचे ते सदस्य आहेत. ‘या ७९ मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आकड्यांमध्ये असलेली तफावत खूप मोठी आहे. या मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या होत्या. या प्रकारातून पक्षपातीपणा दिसून येतो,’ असं मॉरिस म्हणाले.

Source link

bjplok sabha election 2024NDAvote manipulationएनडीएमतदानात घोळमतमोजणीत हेराफेरीमतांमध्ये फेरफारलोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
Comments (0)
Add Comment