वेळ पडलीच तर रहिवाशांना एअरलिफ्ट करा! मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश; पुण्यात धो धो पाऊस

पुणे: रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. ‘पुणे जिल्हाधिकारी, पुण्याचे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, लष्कराचे कर्नल यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Pune Rain: घरातलं सामान पाण्यावर तरंगतंय, वाहून जाऊ नये म्हणून कुलूप लावलंय! पुणेकरांची दयनीय स्थिती
पुण्यातील काही भागांमध्ये पाणी साचल्यानं रहिवासी अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. वेळ पडलीच तर आम्ही रहिवाशांना एअरलिफ्ट करु. यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आलेला आहे. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Pune Rain: पावसाच्या पाण्यातून अंडाभुर्जीची गाडी वाचवण्याचा प्रयत्न, पुण्यात शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू
जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मदत पोहोचेल. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. लोकांनी काळजी करु नये. प्रशासन तुमच्या मदतीला आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ‘अजित पवार स्वत: कंट्रोल रुममध्ये आहेत. त्यांनी पुण्यातीस परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. ते अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. गरजूंना सगळी मदत देण्यात येईल. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल,’ अशी माहिती शिंदेंनी दिली आहे.

पुण्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. खडकवासला धरणातून मध्यरात्री पाणी सोडण्यात आलं. मात्र याची कल्पना नदीपात्राजवळ राहणाऱ्यांना देण्यात आलेली नव्हती. रहिवाशांच्या घरात रात्री अचानक पाणी शिरलं. यावेळी अनेकजण साखरझोपेत होते. घरं पाण्याखाली गेल्यानं लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. सिंहगड रोड, डेक्कन परिसरातील अनेक भागांत पाणी साचलं आहे.

Source link

eknat shindePune newspune rainpune rain newspune rain updateएकनाथ शिंदेपुणे न्यूजपुणे पाऊसपुणे पाऊस अपडेटपुणे पाऊस बातम्या
Comments (0)
Add Comment