पुण्यात मुसळधार पावसाने पूर, लेकीला खांद्यावर घेतलं, पाच फूट पाण्यातून वाट काढत बाप निघाले

पुणे : पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यातच खडकवासला धरणातून पूर्वसूचनेविना पाणी सोडले गेल्याने काही रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. हे नागरिक हवालदिल होऊन प्रशासनाकडे मदत मागत आहेत. तर जवळपास पाच फूटापर्यंत साचलेल्या पाण्यातून वाट काढत एक तरुण चालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या चिमुकल्या लेकीला खांद्यावर बसवून छातीभर पाण्यातून हा बाप सुरक्षित स्थळी मार्गक्रमण करताना दिसत आहे. तर अन्य एका व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या मुलीला खांद्यावर घेत पुरातून बाहेर जाताना दिसत आहे.

दुसरीकडे, कात्रज पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पाटबंधारे विभागामार्फत तलावाचे पाणी अडवण्यासाठी असलेली यंत्रणा पूर्णपणे उघडण्यात आली आहे. त्यामुळे कात्रज नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय ओढा येथून आंबील ओढ्यामध्ये पाणी पुढे जात आहे.

Pune Rain: वेळ पडलीच तर रहिवाशांना एअरलिफ्ट करा! मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश; पुण्यात धो धो पाऊस

शॉक लागून तिघांचा मृत्यू

दरम्यान, डेक्कन नदीपात्र परिसरात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री घडली. नदीला पाणी वाढल्याने येथील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना त्यांना शॉक बसल्याची माहिती आहे. त्यानंतर तात्काळ उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

पुण्यातील पावसाची स्थिती काय?

-पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर निम्म्याहून जास्त पाण्याखाली गेले आहे
-मावळ आणि मुळशीमध्ये पर्यटन स्थळांवर जाण्यास चार दिवस बंदी
– संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचे पिलर पाण्याखाली
Pune Rains : चार दिवस मुसळधार, तीन किमी रस्ते पाण्याखाली, स्थानिकांची उपासमार, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
दरम्यान, ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर लवासा जवळील दासवे गावात दरड कोसळल्याने काही जण अडकल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माहिती दिली.

एनडीआरएफची टीम मदतीला

पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्याने सिंहगड रस्ता डेक्कन परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने पुणे महापालिकेने लष्कराकडे मदत मागितली होती, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली. एनडीआरएफच्या दोन टीम एकता नगरकडे रवाना झाल्या आहेत. तेथे अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी या टीम पाठवल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सिंहगड रस्ता परिसरात पाहणी करत आहेत तर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी नियंत्रण कक्षाचा आढावा घेऊन यंत्रणा कार्यान्वित करत आहेत

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात पुणे शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी बचाव मदतीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Source link

Ekta Nagar Water LoggingPune FloodsPune Rainsपुणे पाऊस अपडेट्सपुणे बाप मुलगी पूर व्हिडिओपुणे मुसळधार पाऊस
Comments (0)
Add Comment