Assembly Elections: विधानसभेसाठी महायुतीत हालचाली; भाजपच्या बालेकिल्ल्यावर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा, वातावरण तापणार!

नवी मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. नवी मुंबईतील ऐरोली विधासभा मतदारसंघ हा शिवसेनेला (शिंदे गट) सोडण्यात यावा यासाठी आग्रह सुरु आहे. मात्र आता दुसरीकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघावरही शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी दावा केला आहे. बेलापूर मतदारसंघावर दावा करत निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे विजय नाहटा यांनी एका कार्यक्रमात मत मांडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीत भाजप-शिवसेनेकडे कोणता मतदारसंघ असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Assembly Elections महायुती की मविआसोबत लढणार? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
शिवसेनेत पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यावेळी नाहटा यांनी आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक तर बेलापूर हा आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे आहे. म्हणजेच दोन्ही मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये विधानसभेला समसमान जागा वाटप व्हावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील एक मतदारसंघ शिवसेनाला देण्यात यावा, अशी मागणी विजय चौगुले यांनी लावून धरली आहे. त्यातच बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उपनेते आणि माजी सनदी अधिकारी विजय नाहटा हे देखील इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.

मागील काही महिन्यांपासून नाहटा यांनी बेलापुरात आपला जनसंपर्क देखील वाढविला आहे. २१ व्या शतकातील विस्तीर्ण होणार्‍या नवी मुंबईला एक ओळख आहे. कोकभवन येथे विभागीय अधिकारी, नवी मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. आयएएस अधिकारी म्हणून काम केले आहे. शहरातील अनेक प्रकल्पाची उभारणी आपण केली आहे. त्यामुळे या शहराच्या गरजांची जाणीव असून आपण यासाठी पात्र असल्याने इच्छा व्यक्त केल्याचे विजय नाहटा म्हणाले आहेत. आता या बेलापूर मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर महायुतीच्या भाजप आणि शिंदे गटात वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यानंतर अखेर हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे.

Source link

belapur constituency newsvijay nahata claims belapur constituencyvijay nahata newsvijay nahata on belapur constituencyमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकविजय नाहटा विधानसभा निवडणूक दावाविधानसभा निवडणूक बातमीशिंदे गट बातमी
Comments (0)
Add Comment