Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून मार खाल्ला, भाजपचे मिशन विधानसभा, नाशिकची जबाबदारी विखेंकडे!

नाशिक : लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ‘मिशन विधानसभा’अंतर्गत जिल्हानिहाय संघटनात्मक प्रभारींच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी संघटनात्मक प्रभारी म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारी (दि. २७) त्यांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय आढावा बैठक होणार आहे.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असून, बैठकींनंतर महायुतीतील घटकपक्षांना कोणत्या जागा सोडायच्या याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठवला जाणार आहे. लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत दि. २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी केवळ १७ जागांवरच महायुतीला विजय मिळाला. त्यातही भाजपची २३ जागांवरून नऊ जागांवर घसरगुंडी उडाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही लक्ष केंद्रित केले आहे.
Raj Thackeray : लाडके बहीण-लाडका भाऊ एकत्र आले असते, तर दोन्ही पक्ष टिकले असते, राज ठाकरेंचा टोला

जिल्हानिहाय संघटनात्मक प्रभारी नियुक्त

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात मंथन झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारींकडून जिल्हानिहाय संघटनात्मक प्रभारी नियुक्त करण्यात आले. त्यांच्यावर जिल्ह्यातील विधानसभांचा आढावा घेण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नाशिकसाठी संघटनात्मक प्रभारी म्हणून विखे-पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे.
लोकसभेला ज्यांनी लपून छपून मतदान केले, ते विधानसभेला सोबत येतील, जयंत पाटील यांनी वात पेटवली

१५ विधानसभांचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार

नाशिक शहर, नाशिक उत्तर जिल्हा, नाशिक दक्षिण जिल्हा आणि मालेगाव जिल्हा असे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यानुसार या चारही विभागांतील जिल्हाध्यक्ष, आमदार, सरचिटणीस, चिटणीस, कार्यकारिणी सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत १५ विधानसभांचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाईल. या बैठकीस विखे-पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, तसेच आमदार उपस्थित राहणार आहेत.
Amit Shah: सहा बडे साखरसम्राट भेटीला; पवारांना शह देण्यासाठी शहांची फिल्डींग, मोहोळांवर जबाबदारी

प्रत्येक मतदारसंघात विस्तारक

विधानसभानिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच विधानसभेत पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे. मंडलस्तरावर विशेष लक्ष दिले जाणार असून, शक्ती केंद्रे अधिक मजबूत केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभेत पूर्णवेळ विस्तारक म्हणून नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासोबतच जिल्हाध्यक्ष आणि युवा कार्यकर्त्यांकडेही विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे. सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी काय करायला हवे, याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रदेशाध्यक्षांना देणार अहवाल

सद्यस्थितीत जिल्हात १५ विधानसभा मतदारसंघ असून, त्यात पाच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. नाशिक शहरात तीन, तर ग्रामीणमध्ये बागलाण आणि चांदवड या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे पाच आमदार आहेत. ग्रामीण भागातील विधानसभेच्या अधिक जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहेत. त्यामुळे जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक भूमिका घेणार असल्याने भाजपकडून प्रत्येक मतदारसंघनिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेऊन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर केला जाणार आहे.

Source link

Maharashtra BJPNashik Vidhan Sabharadhakrishna vikheVidhan Sabha ElectionVidhan Sabha Election 2024महाराष्ट्र भाजप विधानसभा निवडणूकराधाकृष्ण विखेविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment