Anil Deshmukh: अनिल देशमुखांनी पेन ड्राईव्ह दाखवला; देवेंद्र फडणवीसांना थेट आवाहन, काही पुरावे असेल तर ते उघड करा

नागपूर (जितेंद्र खापरे) : आपल्या वक्तव्यावर ठाम राहून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पेन ड्राईव्ह दाखवत फडणवीस यांच्याकडे कोणताही व्हिडिओ नसल्याचे म्हटले आहे. असेल तर शेअर करा. पेनड्राइव्ह दाखवत अनिल देशमुख म्हणाले, “मी फडणवीसांबद्दल जे काही बोललो ते पुराव्याशिवाय बोलत नाही. माझाकडे सर्व पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहे.” “मी फडणवीसांना जाहीर आवाहन करतो. त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर ते उघड करावेत.

अनिल देशमुख म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जे बोललो की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार अनिल परब, यांच्या विरोधात माझ्यावर दबाव टाकला होता. त्यावर मी काल वक्तव्य केलं होतं. आणि अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव टाकून मला आमच्या सर्व नेत्यांच्या विरोधात खोटे आरोप करायला लावले होते, असेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
Shyam Manav: मग त्यावेळी जनसंघाची सुपारी घेतली होती काय? श्याम मानव यांचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे यामध्ये सर्व पुरावे आहे. वेळ आल्यावर मी हे पुरावे समोर आणेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात व्हिडिओ क्लिप आहे असे म्हटले होते. त्यावर बोलताना देशमुख म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो जर त्यांच्याकडे माझ्या बाबतीत जे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे ते त्यांनी जनतेसमोर आणावे. मला माहिती आहे त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिप नाही. तरीही काहीतरी आरोप करायचे म्हणून त्यांच्याकडे काहीतरी व्हिडिओ क्लिप असल्याचे ते बोलत आहे.

बावनकुळे म्हणाले- पुरावे होते तर आधी तक्रार का केली नाही?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव आणि माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय तापमान वाढले आहे. फडणवीस यांच्यावरील आरोपांमुळे भारतीय जनता पक्ष संतापला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावत बावनकुळे म्हणाले, पुरावा होता तर आधी तक्रार का केली नाही. यासोबतच त्यांनी हे आरोप बनावट असल्याचे म्हटले आहे. श्याम मानव यांच्यासारख्या व्यक्तीला पुढे करून काँग्रेसला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवायचा आहे.

Source link

anil deshmukh on devendra fadnavisMaharashtra politicsmaharashtra politics latest newsmaharashtra politics newsअनिल देशमुखदेवेंद्र फडणवीसनागपूर ताज्या बातम्यानागपूर बातम्या
Comments (0)
Add Comment